आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • India China Ladakh Border Clash Updates Face Off With Chinese Troops In Galwan Valley; Indian Army Soldiers Martyred, PM Modi China LAC Visit

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चीनसोबतच्या वादाची संपूर्ण गोष्ट:58 वर्षात चौथ्यांदा एलएसीवर भारतीय जवान शहीद, पंतप्रधान मोदी पाचवेळा चीनला गेले

10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • भारत-चीन लष्करामध्ये गलवान घाटीत झालेल्या हिसंक मारामारीपूर्वी 1975 मध्ये अरुणाचलच्या तवांगमध्याही वाद झाला होता, तेव्हा 4 सैनिक शहीद झाले होते.
  • 1967 मध्ये सिक्किम बॉर्डरजवळ दोन्ही सेनेंचा सामना झाला होता, तेव्हा भारताचे 80 सैनिक शहीद झाले होते, चीनचे 400 सैनिक मारले गेले होते

भारत आणि चीनचा वाद गोठलेल्या पाण्यासारखा आहे. चीनने 58 वर्षात चौथ्यांना भारतासोबत विश्वासघात केला आहे. कारण, तेच जुने सीमा वाद. ही सीमा 4 हजार 056 किमी लांब आणि हिमालय रेंजमध्ये पश्चिमपासून पुर्वेपर्यंत आहे. ही सीमा जगातील सर्वात उंच ठिकाणावर आहे. येथे सर्वात खराब वातावरणात सैनिक तैनात असतात. या परिसरातील अनेक ठिकाणी वर्षभर तापमान शून्यापासून खाली असते.

ही जगातील सर्वात मोठी सीमा आहे, ज्याची अजून संपूर्ण मॅपींग झाली नाही. भारत मॅकमाहोन लाइनला वास्तविक सीमा मानतो, तर चीन याला सीमा मानत नाही. या लाइनसाठीच 1962 मध्ये भारत-चीन युद्ध झाले होते. चीनने लद्दाख, अरुणाचल प्रदेशसह अनेक ठिकाणी भारताच्या जमीनीवर कब्जा केला होता. परंतू, चीनचा हा कब्जा 58 वर्षानंतरही कायम आहे. जोपर्यंत चीनचा कब्जा आहे, त्याला लाइन ऑफ ऐक्चुअल कंट्रोल(एलएसी) किंवा वास्तविक नियंत्रण रेषेच्या नावाने ओळखली जाते.

गलवनची परिस्थिती काय आहे?

1962 मध्ये चीनने येथील गोरखा पोस्टवर हल्ला केला होता

भारताचे 20 सैनिक ज्या ठिकाणी शहीद झाले, तो परिसर लद्दाखमध्ये आहे. याचेच नाव गलवन घाटी आहे. गालवन घाटी अक्साई चीन क्षेत्रात येते. याच्या पश्चिमेकडे  1956 पासून चीनने आपला कब्जा असल्याचा दावा करत आला आहे.

1960 पासून अचानक गालवन नदीच्या पश्चिम परिसरात, आसपासच्या पर्वत रांगेत आणि श्योक नदी घाटीवर चीन आपला दावा करत आला आहे. पण भारत नेहमी सांगत आला आहे की, अक्साई चीन भारताचा भाग आहे. यानंतर 1962 मध्ये भारत-चीनदरम्यान युद्ध झाले. तेव्हाही चीनने  गोरखा पोस्टवर हल्ला केला होता.

चीनच्या पीपुल्स लिबरेशन आर्मीने याच गालवन पोस्टवर प्रचंड गोळीबारी आणि बॉम्ब टाकण्यासाठी एक बटालियन पाठवली होती. यादरम्यान, 33 भारतीयांचा मृत्यू झाला होता, तर अनेक कंपनी कमांडर आणि इतर लोकांना चीनने बंदी बनवले होते. यानंतर चीनने अक्साई-चीनवर आपलया दावा असलेल्या क्षेत्रावर कब्जा केला होता.

सध्या सुरू असलेल्या वादामाग दोन कारणे आहेत

आर्थिक कारण

जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्था 5 महीन्यांपासून कोरोना व्हायरसमुळे मंदतीच्या विळख्यात आहेत. चीन, अमेरिका, भारत, यूरोपीयन देशांचा जीडीपी घसरला आहे. एक्सपर्ट्सनी याची तुलना 1930 च्या 'द ग्रेट डिप्रेशन'सोबत केली आहे. यासर्वात 17 एप्रिलला भारत सरकारने एक आश्चर्यचकीत करणारा निर्णय घेतला. सरकारने प्रत्यक्ष परदेशी गुंतवणूक, म्हणजेच एफडीआयच्या नियमांना शेजाऱ्यांसाठी अजून कडक केला. याचा सर्वात जास्त परिणाम चीनवर पडला आहे.

कोरोना व्हायरस

नुकतंच 194 सदस्य देशांच्या वर्ल्ड हेल्थ असेंबलीमध्ये एक प्रस्ताव सादर करण्यात आला की, कोरोना प्रकरणाची चौकशी व्हायला हवी. जगभरात नुकसान पोहचवणारा व्हायरस कुठून पसरला आहे, हे जगासमोर यायला हवे. ही असेंबली जागतीक आरोग्य संघटना(डब्लूएचओ) ची प्रमुख प्रमुख विंग आहे. भारतानेही याचे समर्थन केले होते.

भारत-चीनच्या 1962 च्या युद्धाचे कारण कोणते होते?

चीनने 20 ऑक्टोबर 1962 ला भारतावर हल्ला चढवला होता. कारण सांगण्यात आले- विवादित हिमालय सीमेचे. पण, मुख्य कारण दुसरेच होते. यात सर्वात प्रमुख कारण म्हणजे, 1959 मध्ये तिब्बती विद्रोहानंतर दलाई लामांना शरण देणेहोते.

चीनने लद्दाखच्या चुशूलमध्ये रेजांग-ला आणि अरुणाचलच्या तवांगमध्ये भारतीय जमिनींवर अवैधरित्या कब्जा केला होता. यासोबतच चीनने भारताच्या चार पथकांवर एकदाच हल्ला केला होता. हे पथके- लद्दाख, हिमाचल, उत्तराखंड आणि अरुणाचल होते.

या युद्धात चीनचा विजय झाला होता. परंतू तेव्हा भारत युद्धासाठी तयार नव्हता. चीनने एका महीन्यानंतर 20 नोव्हेंबर 1962 ला युद्ध थांबल्याची घोषणा केली होती.

एलएसीवर किती वर्षानंतर सैनिक शहीद झाले ? 

दोन्ही देशांचे जवान मागच्या महिन्यापासूनच लद्दाखमध्ये समोरा-समोर आले आहेत. मागच्या महिन्यात दोन्ही देशांमध्ये पूर्व लद्दाखच्या पैंगोंग आणि सिक्किमच्या नाकुलामध्ये हाणामारी झाली होती.

यापूर्वी भारत-चीन सीमेवर 1975 मध्ये कोण्या एका सैनिकाचा एलएसीवर मृत्यू झाला होता. तेव्हा भारतीय सेनेच्या गस्त घालणाऱ्या पथकावर अरुणाचल प्रदेशात चीनने हल्ला केला होता.

1962 नंतर दोन्ही देशांमध्ये कोणते वाद झाले?

1967- नाथु ला दर्रेजवळ वाद झाला

1967 चा वाद तेव्हा सुरू झाला, जेव्हा भारताने नाथु ला पासून सेबू ला पर्यंत तार लावून बॉर्डरची मॅपिंग केली. 14,200 फूटावरील नाथु ला दर्रा तिब्बत-सिक्किम सीमेवर आहे. याच्या जवळून जुन्हा गँगटोक-यातुंग-ल्हासा रस्ता जातो.

1965 च्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान, चीनने भारतला नाथु ला आणि जेलेप ला दर्रे रिकामे करण्यास सांगितले होते. भारताने जेलेप ला रिकामा केला, पण नाथु ला दर्रेवर परिस्थिती जैसे थेह होती. यानंतर नाथु ला वादाचे कारण झाले.

भारतीय सीमेवर चीनने घुसखोरी केली आणि परत दोन्ही देशांच्या जवानांमध्ये मारामारी झाली. काही दिवसानंतर चीनने मशीन गनने भारतीय सैनिकांवर हल्ला केला, भारतानेही याला प्रत्युत्तर दिले. अनेक दिवस ही लढाई सुरूच होती.

चीनी सेनेने वीस दिवसानंतर परत भारतीय सीमेत पुढे येण्याचा प्रयत्न केला. ऑक्टोबर 1967 मध्ये सिक्किम तिब्बत बॉर्डरच्या चो ला जवळ भारताने चीनला चांगलेच उत्तर दिले. त्यावेळेस भारताचे 80 सैनिक शहीद झाले होते, तर चीनचे 300-400 सैनिक मारले गेले होते.

1975- चीनने अरुणाचलच्या तुलुंगलमध्ये हल्ला केला होता

1967 चा पराजय चीनला केधीचपचला नाही तेव्पासून ते अनेकवेळा सीमेवर तणाव वाढवण्याचा प्रयत्न करतात.अशात एक संधी 1975 मध्ये आली होती. अरुणाचल प्रदेशच्या तुलुंग ला मध्ये असाम रायफल्सच्या  जवानांच्या पेट्रोलिंग टीमवर हल्ला चढवण्यात आला होता. या हल्ल्यात चार भारतीय जवान शहीद झाले होते. भारताने म्हटले की, चीनने एलएसीवर भारतीय सेनेवर हल्ला केला. पण, चीनने भारताच्या दाव्यांचे खंडन केले.

पाच वेळा चीनला गेले, 6 वर्षात जिनपिंगसोबत 18 वेळा भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2014 मध्ये सत्तेत आल्यानंतर चीनसोबतचे संबंध चांगले ठेवले. यानंतर चीनी राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्यासोबत मोदींनी 18 वेळा भेटी झाल्या. यात वन-टू-वन मीटिंगसोबतच इतर देशांसोबत झालेल्या बैठकाही सामील आहेत. मोदी पाचवेळा चीन दौऱ्यावर गेले.  मागील 70 वर्षात भारताच्या पंतप्रधनांचे हे सर्वात जास्त दौरे आहेत.

बातम्या आणखी आहेत...