आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • India China Ladakh Border Tension Latest News Update : China Doubles Air Defense Near Indian Border In Three Years, Launches 13 New Military Bases

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सीमावाद:चीनने तीन वर्षांत भारतीय सीमेजवळ हवाई संरक्षणात केली दुप्पट वाढ, 13 नवे सैन्य तळ उभारणे सुरू केल्याचा वृत्तात दावा

नवी दिल्ली7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र लडाखमधील आहे. भारत आणि चीनमध्ये कोअर कमांडरांमधील चर्चेदरम्यान भारतीय सैन्याने हेलिकॉप्टर व विमानांची गस्त वाढवली आहे. - Divya Marathi
छायाचित्र लडाखमधील आहे. भारत आणि चीनमध्ये कोअर कमांडरांमधील चर्चेदरम्यान भारतीय सैन्याने हेलिकॉप्टर व विमानांची गस्त वाढवली आहे.
  • डोकलामनंतर चीनची एकीकडे भारताशी चर्चा सुरू, तर दुसरीकडे कुरापतीही थांबेनात

भारतासोबतच्या डोकलाम वादानंतर चीनने तीन वर्षांमध्ये भारतीय सीमेज‌वळ हवाई तळ, हवाई संरक्षण आणि हेलिपोर्टच्या संख्येत दुप्पट वाढ केली आहे. चीनने सीमेजवळ १३ नव्या सैन्य तळांचे काम सुरू केले आहे. यात तीन हवाई तळ, पाच स्थायी हवाई संरक्षण बेस, इलेक्ट्रॉनिक युद्धक सुविधा, हेलिपोर्टचा समावेश आहे. एनडीटीव्हीच्या एका वृत्तामध्ये स्टॅटफॉरकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे हा दावा करण्यात आला आहे. स्ट्रॅटफॉर हा आघाडीचा गुप्त प्लॅटफॉर्म आहे. वृत्तानुसार, स्ट्रॅटफॉरचे वरिष्ठ ग्लोबल अॅनालिस्ट सिम टॅक यांच्या मते, सीमेवर चीनकडून सुरू असलेले निर्माणकार्य भारत आणि चीनमध्ये लडाखमध्ये सुरू असलेल्या तणावाची तीव्रता दर्शवणारे आहे.

हा चीनकडून सीमेवर तणाव वाढवण्याच्या योजनेचा महत्त्वाचा भाग आहे. सीमेजवळ असलेल्या ठिकाणांजवळ नियंत्रण ठेवणे चीनचा हेतू आहे. बहुतांश क्षेत्रांमध्ये सैन्य निर्माणकार्य अद्याप सुरू आहे. हे पूर्ण होण्यासाठी जास्त वेळ लागणार आहे. वृत्तामध्ये उपग्रहांद्वारे मिळालेल्या छायाचित्रांच्या आधारे, चीनकडून सुरू असलेल्या निर्माणकार्याचे विश्लेषण आहे.

कोअर कमांडरांमध्ये १३ तास बैठक, चीनने एलएसीवरून माघारी जावे : भारत

भारत आणि चीनमध्ये सीमेवर सुरू असलेल्या तणावामध्ये सहाव्या टप्प्यात १३ तास चर्चा झाली. ही बैठक चीनमधील मोल्डो क्षेत्रामध्ये झाली. या दरम्यान एलएसीवरून सैनिकांना माघारी घेण्याच्या विषयावर चर्चा झाली. सुत्रांनुसार, भारताने चीनला वादग्रस्त जागांवरून आपले सैन्य माघारी घेण्यास सांगितले आहे. हा पाच सूत्री कराराचा भाग आहे. चीनने आधी घुसखोरी केली होती. यामुळे आधी चीनने माघार घ्यायला हवी. भारताने बैठकीत पँगाँग टीएसओ फिंगर, हॉस्ट स्प्रिंग्ज आणि देपसांग पॉइंटचा मुद्दा देखील उपस्थित केला. तसेच चिनी सैन्याने माघार न घेतल्यास भारतीय सैन्य तेथे दीर्घकाळापर्यंत तैनात राहील, असा इशारा भारताने दिला आहे. भारताने लडाखमध्ये एलएसीवर जवळ रोडमॅप तयार करणार असल्याचे सांगितले.

अमेरिका: चीनसाठी तिबेटींची हेरगिरी, पोलिस अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

न्यूयॉर्क | अमेरिकेमध्ये न्यूयॉर्क पोलिसांनी एक अधिकाऱ्यावर चीनसाठी तिबेटींची हेरगिरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलिस अधिकाऱ्यांनुसार, आरोपी बैमादाजिए आंगवान (३३) हा मूळ तिबेटी आहे. मात्र तो चीन सरकारसाठी अमेरिकेत तिबेटी स्वातंत्र्य आंदोलनातील समर्थकांची हेरगिरी करत होता. तो चीनसाठी अवैध एजंटसाठी काम करत होता. आरोप सिद्ध झाल्यानंतर ५५ वर्षांसाठी तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.

बातम्या आणखी आहेत...