आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • India China Ladakh Border Updates | Indian Army Vs China People Liberation Army (PLA) Galwan Valley, Ladakh Line Of Actual Control (LAC) Latest News Updates

भारत-चीन सीमा विवाद:गलवानच्या हिंसक झडपेच्या 3 दिवसांनंतर चीनने भारताच्या 2 मेजरसह 10 जवानांना सोडले

नवी दिल्ली2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • या चकमकीत 76 सैनिक जखमी झाले आहेत, कोणतेही सैनिक बेपत्ता आहेत, असे सैन्याने गुरुवारी सांगितले

लडाखच्या गलवान भागात 15 जून रोजी भारत आणि चीनच्या सैनिकांत झालेल्या झडपमध्ये शुक्रवारी नवीन बाब समोर आली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, चिनी सैन्याने भारताच्या 10 जवानांना बंदी बनवले होते. गुरुवारी झालेल्या चर्चेनंतर त्यांना सोडण्यात आले. परंतु यावर लष्कारचे अधिकृत विदान आले नाही.  

गलवान खोऱ्यात सोमवारी रात्री भारत आणि चीनच्या सैनिकांत झालेल्या हिंसक झडपमध्ये भारताचे 20 सैनिक शहीद झाले. तर चीनचे देखील 40 सैनिक मारले गेले. यामध्ये युनिटच्या कमांडिंग ऑफिसरचा समावेश आहे. भारतीय जवानांसोबत हिंसक झडप केलेल्या युनिटचा तो ऑफिसर होता. 

लष्कराने म्हटले - गलवानमध्ये 76 सैनिक जखमी झाले होते

गलवान खोऱ्यात भारतीय आणि चिनी सैनिकांच्या चकमकीत जखमी झालेला एकाही भारतीय जवान गंभीर नाही. वृत्तसंस्था एएनआयने लष्करी सुत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली. सुत्रांनी सांगितले की, 18 जवान लेह आणि 58 सैनिक इतर रुग्णालयांत भरती आहेत. या सर्वांची प्रकृती स्थिर आहे. लेह येथील 18 जवान 15 दिवसांत पुन्हा ड्युटीवर येतील. इतर रुग्णालयांत भरती जवानांना ड्युटीवर येण्यात एक आठवड्याचा कालावधी लागू शकतो. दुसरीकडे कोणताही सैनिक बेपत्ता नसल्याचे लष्काराने सांगितले. 

दोन्ही दलांच्या मेजर जनरल यांनी सलग तीन दिवस बैठक घेतली
    
चीन आणि भारताच्या मेजर जनरल यांच्या गलवान विवाद मिटवण्यासाठी गुरुवारी सलग तिसऱ्या दिवशी बैठक झाली. जवळपास 6 तास ही बैठक चालली. ही बैठक गलवान खोऱ्याजवळच झाली. यामध्ये कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली याची माहिती अद्याप समोर आली नाही. याआधी बुधवारी झालेल्या चर्चेत दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांमध्ये सहमती झाली नव्हती. मंगळवारी देखील झडपेबाबत चर्चा झाली होती.  

बातम्या आणखी आहेत...