आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • India China Ladakh Galvan Valley Border Update Live Ground Report From Leh | Indian Army Preparation In Ladakh | Leh Locals Retired Army Sonam Wangchuk On India Vs China War Possibility Chance

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ग्राउंड रिपोर्ट-1:आकाशात फिरत असलेले फायटर प्लेन करगिल युद्धाची आठवण करुन देतात, 'घरातील मुले सीमेवर तैनात असल्यास आईला झोप कशी येईल...?'

लेहएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • काय होईल, परत युद्ध होणार नाही ना? सध्या लड्डाखच्या घरा-घरांमध्ये ही एकच चर्चा सुरू आहे

उपमिता वाजपेयी

कुशोक बकुला रिम्पोचे एअरपोर्टच्या लहान रननेपासून विमान काही अंतरावर असताना, कॅबिन क्रू ने अनाउंसमेंट केली- ‘लेह एक डिफेंस एअरपोर्ट आहे, याठिकाणी फोटो घेण्यास बंदी आहे, जय हिंद.’

30 मिनीटांपर्यंत बर्फाछादीत पर्वतांवर फिरल्यानंतर स्पाइस जेटचे हे विमान लँड झाले. विमानाच्या आत असतानाच फायटर प्लेनचे आवाज ऐकू येऊ लागले. एअरपोर्ट बसने जेव्हा अरायवल गेटवर पोहचवले आणि तिथे कोरोना संबंधित रजिस्ट्रेशन पूर्ण झाले, तोपर्यंत चार फायटर आणि दोन ट्रांसपोर्ट एअरक्राफ्ट विमाने उड्डाण घेताना दिसले. यातील काही सुखोई तर काही वायुसेनेत नवीन भरती झालेले चिनूक हेलिकॉप्टर होते.

एअरपोर्टवरुन आम्ही थेट कर्नल सोनम वांगचुक यांच्या घरी गेलो. लद्दाखचा वाघ म्हटले जाणारे रिटायर्ड कर्नल सोनम वांगचुक यांना करगिल युद्धात शौर्यासाठी देशाचा दुसरा सर्वात मोठे महावीर चक्र मिळाले आहे. लेहमधील लोकप्रिय शांती स्तूपपासून काही अंतरावर त्यांचे घर आहे. घराबाहेर त्यांचे वडील फिरताना दिसले.

सोनम वांगचुक यांचे वडील 92 वर्षांचे आहेत. ते हिमाचल प्रदेशातील धर्मशाळेत दलाई लामाचे सिक्योरिटी ऑफिसर होते.
सोनम वांगचुक यांचे वडील 92 वर्षांचे आहेत. ते हिमाचल प्रदेशातील धर्मशाळेत दलाई लामाचे सिक्योरिटी ऑफिसर होते.

सोनम वांगचुक यांची आई लद्दाखमधील प्रसिद्ध बौद्ध गुरु कुशोक बकुला रिम्पोचे यांची नातेवाईक आहे. हे तेच रिम्पोचे आहेत, ज्यांचे नाव लेह विमानतळाला दिले आहे. आम्ही घराकडे येत असताना त्या आमच्याकडे पाहून हसतात. तेव्हा अचानक एक फायटर जेट आकाशातून जाते आणि वांगचुक यांच्या चेहऱ्यावर चिंतेचे भाव येतात. त्यांना याबाबत विचारल्यावर म्हणाल्या की, करगिल युद्धाची आठवण आली. तेव्हाचा काळ आठवतो, जेव्हा माझा मुलगा अशाच पर्वत रांगांमध्ये युद्ध लढत होता.

कर्नल वांगचुकच्या आई म्हणतात, जेव्हा घरातील मुले सीमेवर आहेत, तेव्हा झोप कशी येणार
कर्नल वांगचुकच्या आई म्हणतात, जेव्हा घरातील मुले सीमेवर आहेत, तेव्हा झोप कशी येणार

दोन वर्षांपूर्वी लष्करातून निवृत्त झालेले कर्नल सोनम वांगचुक सांगतात की, सध्या लड्डाखच्या घरा-घरात एकच चर्चा सुरू आहे. काय होईल, परत युद्ध सुरू होणार नाही ना ? येथील अनेक कुटुंबातील व्यक्ती सैन्यात असल्यामुळे या चिंता सामान्य आहेत.

रिटायर्ड कर्नल सोनम वांगचुक
रिटायर्ड कर्नल सोनम वांगचुक

तीन दिवसांपूर्वी गलवानमध्ये शहीद झालेल्या सैनिकांचे मृतदेह लेहमध्ये आले, तेव्हा अनेक माता त्यांना वंदन करण्यासाठी रस्त्यावर आल्या. लद्दाखचे पारंपरिक स्कार्फ खदक हवेत फडकवून त्यांनी त्या 20 शहीदांना श्रद्धांजली दिली. यासोबतच परिसरत भारत माता की जय....या घोषणेने दणाणून गेला. 

कर्नल सोनम सांगतात की, “या परिसरातील क्वचितच घरातील व्यक्ती सैन्यात नसेल. सध्या हे सर्व मोबेलाइज झाले आहेत. यामुळेच लड्डाखच्या घरांमध्ये सध्या तणाव जास्त आहे. लद्दाखच्या नागरिकांचा चीनवरील राग नवीन नाही. येथील नागरिकांना नेहमी वाटते की, चीनने त्यांच्या जमिनींवर कब्जा केला आहे. मी जेव्हा देमचोक, पैंगॉन्गमध्ये तैनात होतो, तेव्हा मी पाहिले आहे. चीन आपल्या लोकांना भारतीय भागात फिरू देतो, पण भारतीय नागरिकांना त्यांच्या सीमेत फिरू देत नाही.”

कोरोना व्हायरस आणि सीमेवरील तनावामुळे लेहच्या मार्केटमध्ये कोणीच दिसत नाहीये.
कोरोना व्हायरस आणि सीमेवरील तनावामुळे लेहच्या मार्केटमध्ये कोणीच दिसत नाहीये.

कर्नल सोनम पुढे सांगतात की, “सध्या वाद रस्ता बनवण्याचा आहे. चीनला आम्ही सीमेपर्यंत इंफ्रास्ट्रक्चर तयार केलेले नकोय. परंतू, चीनने सीमेच्या टोकापर्यंत रस्ता बनवला आहे." 

रस्त्याचा विषय आला म्हणून आम्ही सांगू इच्छितो की, ज्या विमानातून आम्ही लेहला आलो, त्यात एक दोन स्थानिक नागरिकांव्यतिरीक्त बिहारवरुन येणारे प्रवासी मजूर होते. हेच मजूर रस्ता बनवण्यासाठी लेहला आले आहेत. आम्ही येथील एक मजूर राहुलला विचारल्यास त्याने सांगितले की, तो मागील चार वर्षांपासून मार्च ते नोव्हेंबरपर्यंत येथे नोकरी करतो. त्यांची कंपनी दरवर्षी त्यांना बिहारमधून येण्यासाठी विमानाचे तिकीट आणि दरमहा 20 हजार रुपये पगार देते.

सीमेवरील परिस्थिती पाहता, लष्कराने लेह सिटीपासून 20 किमी बाहेरील सर्व रस्ते मीडिया आणि टूरिस्टसाठी बंद केले आहेत. फक्त येथील सामान्य नागरिकांना आयडी कार्ड दाखवून त्यांच्या गावी जाण्याची परवानगी आहे. सीमेवरील परिस्थिती कशी आहे, कोणालाच माहित नाही.

अहमदाबादमध्ये तैनात असलेले नुब्राचे एक जवान याच फ्लाइटने सुट्टीवर आपल्या घरी आले होते. त्यांच्याशी आम्ही यादरम्यान बातचीत केली. ते म्हणाले की,  “चीन सीमेवरील गावात त्यांचे नातेवाइक आहेत, पण मोबाइल सेवा बंद असल्यामुळे मागील दोन महिन्यांपासून त्यांच्याशी संपर्क झाला नाही.”

लेहचे प्रवेश द्वार
लेहचे प्रवेश द्वार

सध्या जितक्या मीडिया टीम लेहमध्ये आल्या आहेत, त्या 20 किमीच्या आत कैद आहेत. सामान्यतः डीसी ऑफिस सीमेवर जाण्याची परवानगी लाइन परमिटच्या रुपात देत असतात, पण कोरोनानंतर लॉकडाउनमुळे हे बंद झाले आहे.

बातम्या आणखी आहेत...