आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • India China Ladakh Issue : Either The Prime Minister Or The Locals Of Ladakh Are Lying Rahul Gandhi Tweet

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भारत चीन सीमा वाद:पंतप्रधान किंवा लडाखचे स्थानिक यापैकी कोणी तरी खोटं बोलतंय, राहुल गांधींचा पुन्हा एकदा हल्लाबोल 

नवी दिल्ली10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारत आणि चीन सीमेवर लडाखच्या पूर्वेकडील गलवान खोऱ्यामध्ये 15 जून रोजी हिंसा उसळली होती. या हिंसेत भारताचे 20 जवान शहीद झाले होते. या घटनेच्या काही दिवसांनंतरच कोणीही आपली एक इंचही जमीन बळकावू शकणार नसल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते. तसेच लडाखमध्ये चीनने घुसखोरी केलेली नसल्याचं मोदींनी देशातील नागरिकांना सांगितलं होतं. मात्र यावरुन आता काँग्रेसने पुन्हा एकदा पंतप्रधानांच्या दाव्यावर निशाणा साधला आहे. पंतप्रधान किंवा लडाखचे स्थानिक यापैकी कोणी तरी खोटं बोलतंय, असं म्हणत राहुल गांधींनी मोदी सरकारवर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. 

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ट्विटवरुन 'लडाख स्पीक्स' नावाने एक तीन मिनिटांचा व्हिडिओ पोस्ट केला. या व्हिडिओमध्ये लडाखमधील अनेक स्थानिक नागरिक चीनने लडाखमधील जमीन ताब्यात घेतल्याचा दावा करत असल्याचं दिसत आहे. राहुल गांधी यामध्ये म्हणत आहेत की, लडाखी असं म्हणत आहेत की चीनने आमची जमीन घेतली आहे. पंतप्रधान सांगत आहेत की कुणालाही आमची जमीन मिळाली नाही. अर्थातच यापैकी कोणीतरी खोटं बोलत आहे.

या व्हिडिओमध्ये लडाखमधील अनेक स्थानिक चीन कशाप्रकारे येथील जमीनीवर ताबा मिळवत आहे याविषयी सांगत आहेत. यासोबतच काही जणांनी चिनी सैन्य पाहिलं असल्याची माहिती दिली आहे. यासोबतच काही येथील परिस्थिती बातम्यांपेक्षा अगदीच वेगळी असल्याचं म्हणत आहेत. अनेकांनी लडाखला वाचवण्याची गरज आहे असेही या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे.

बातम्या आणखी आहेत...