आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • India China Ladakh (LAC) Border Dispute Update | Tension Between India And China Increased, Biggest Face Off After 2017 Doklam Dispute

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लडाखमध्ये तणाव:मोदींनी एनएसए आणि सीडीएससोबत चर्चा केली; रस्त्यांचे बांधकाम सुरू राहील, भारतीय सैनिकांची संख्या चीनच्या बरोबरीत राहील

लडाखएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • लष्करी अधिकारी म्हणतात- 'गालवान परिसर वादग्रस्त नाही, तरीही चीननची घुसखोरी'

पूर्व लदाखमध्ये लाइन ऑफ अॅक्च्युअर कंट्रोल (एलएसी)जवळ चीन आणि भारतीय सैन्यात तणाव वाढत चालला आहे. चीनच्या कुरापतीनंतर भारतात देखील परिस्थितीचा सामना करण्याची तयारी सुरू केली आहे. मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उच्चस्तरीय बैठक बोलविली. यात संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, एनएसए अजित डोभाल, सीडीएस बिपिन रावत आणि तीन सैन्य प्रमुख उपस्थित होते. यानंतर मोदींनी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला यांच्याशीही चर्चा केली. याआधी संरक्षणमंत्र्यांनी सीडीएस आणि तीन सैन्याच्या प्रमुखांशी लडाखमधील तणावाबाबत सुमारे एक तास बैठक घेतली होती. 

वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले आहे की, दोन्ही बैठकींमध्ये मोदी आणि राजनाथ यांना चीनच्या कुरावतीवर भारतीय सैन्याच्या प्रत्युत्तराची माहिती दिली.  या बैठकीत दोन महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. पहिला- या भागात रस्त्याचे बांधकाम सुरू राहील. दुसरा - चीन सैनिकांइतकचे भारतीय सैनिक तैनात राहतील. 

पूर्व लडाखमध्ये लाइन ऑफ एक्चुअल कंट्रोल (एलएसी) जवळ चीन आणि भारतीय लष्करात तणाव वाढत आहे. दोन्ही देशांचे सैनिक समोरासमोर आले तर हा वाद 2017 च्या डोकलाम वादापेक्षा मोठा वाद ठरू शकतो. वृत्तसंस्थेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारताने पेंगोंग त्सो सरोवर आणि गालवान खोऱ्यातत सैनिक वाढवले आहेत. या दोन्ही ठिकाणी चीनने आपले 2 ते अडीच हजार सैनिक तैनात केले असून त्यामध्ये सातत्याने वाढ होत आहे. चीन लडाखच्या सीमावर्ती भागांवर मालकी हक्काचा दावा करतो.

'गालवान परिसर वादग्रस्त नाही, तरीही चीननची घुसखोरी'

भारतीय लष्कराच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितल्याप्रमाणे, दोन्ही परिसरांत आपली क्षमता दिवसेंदिवस सुधरत आहे. भारतीय पोस्ट केएम120 आणि गालवान खोऱ्यात चीनच्या सैनिकांची वाढती संख्या हीच सद्यस्थितीला सर्वात मोठी चिंता आहे. नॉर्दन कमांडचे माजी कमांडर लेफ्टनेंट जनरल (रिटायर्ड) डी एस हुड्डा यांनी सांगितल्याप्रमाणे, गालवान परिसरातील भारत-चीन सीमेवर काहीच वाद नाही. तरीही या ठिकाणी चिनी सैनिक एक असाधारण घटना आहे. पूर्व लडाखच्या एलएसी भागांत गेल्या दोन महिन्यांपासून भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये वाद सुरू आहेत. त्यातच भारतीय हद्दीच्या 10 किमी आत घुसून चिनी सैनिकांनी 100 पेक्षा अधिक तंबू ठोकले आहेत. या महिन्यातच दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये तीनदा समोरा-समोर येऊन वाद झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

काय आहे डोकलाम वाद

भारत-चीन बॉर्डरवर डोकलाम परिसरात दोन्ही देशांमध्ये 2017 मध्ये 16 जून ते 28 ऑगस्टपर्यंत वाद सुरू होता. त्यामुळे, दोन्ही देशांचे संबंध बिघडले होते. यानंतर झालेल्या चर्चेमध्ये दोन्ही देशांनी आप-आपले सैनिक मागे घेण्यास सहमती दिली होती. भारतीय सैनिकांनी डोकलाममध्ये रस्ते बांधणाऱ्या चिनी सैनिकांना अडवले होते. त्यावरून दोन्ही देशांच्या सैनिकांत डोकलाम वादाची सुरुवात झाली होती. चीनने हे बांधकाम आपल्याच मालकीच्या हद्दीत सुरू असल्याचा दावा केला होता. डोंगलांग रीजन आपलाच भाग असल्याचा दावा चीन नेहमीच करत आला आहे. भारत-चीन सीमा जम्मू-काश्मीरपासून अरुणाचल प्रदेश पर्यंत 3,488 किलोमीटर लांब आहे. याचा 220 किलोमीटर भाग सिक्कीममध्ये येतो.

बातम्या आणखी आहेत...