आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • India china military meet updates india china high delegation level talks today latest news over ladakh

सीमेवरील तणाव कमी करण्याचा प्रयत्न :भारत-चीनच्या कमांडरांची बैठक झाली, आता भारतीय सेना परराष्ट्र मंत्रालयाला या मुद्द्यावर ब्रीफ करेल

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • शुक्रवार दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्रालयातील अधिकाऱ्यांमध्ये तनाव कमी करण्याबाबत चर्चा झाली

पूर्व लद्दाखमध्ये भारत-चीनच्या सैनिकांमधील तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशांच्या ले. जनरल लेव्हलच्या सैन्य कमांडरांमध्ये चर्चा झाली. या बैठकीसाठी भारतीय डेलिगेशन 14 कॉर्प्स कमांडर लेफ्टिनेंट जनरल हरिंदर सिंग यांच्या अध्यक्षतेखाली लाइन ऑफ एक्चुअल कंट्रोल (एलएसी) च्या पलीकडे मोल्डो पोहचला. अद्याप या चर्चेबाबत अधिकृतरित्या कोणतीच माहिती देण्यात आली नाही. पण, लष्कराच्या प्रवक्त्याने सांगितले की, दोन्ही देशांमध्ये यापुढेही अशा चर्चा होतील.

भारतीय डेलिगेशनने चीनी सेनेच्या मेजर जनरल लियू लिनच्या टीमसोबत सीमा वाद सोडवण्यावर चर्चा केली. लियू साउथ झिंनझियांग सैन्य क्षेत्राचे कमांडर आहेत. यापूर्वी शुक्रवार संध्याकाळी दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी चर्चा केली होती.

आता भारतीय डेलिगेशन लष्कर प्रमुख जनरल एमएम नरवणे आणि नॉर्दन आर्मी कमांडर ले. जनरल वायके जोशी यांना ब्रीफ करेल. यानंतर आर्मी हेडक्वार्टरच्या डीजीएमओ परराष्ट्र मंत्रालय आणि संबंधित अधिकाऱ्यांना चर्चेबाबत माहिती देतील.

लष्कराच्या प्रवक्त्यानुसार, शनिवारी ले. जनरल लेवलच्या चर्चेपूर्वी लोकल कमांडरांमध्ये 12 राउंड आणि मेजर जनरल रँक अधिकाऱ्यांमध्ये 3 राउंड ची चर्चा झाली. पण दोन्ही वेळेस कोणतेच समाधान मिळाले नाही.

मिल्ट्री आणि डिप्लोमॅटिक चॅनलच्या माध्यमातून चर्चा

शुक्रवारी चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गेंग शुआंगने म्हटले की, आता सीमेवर भारत-चीनमधील परिस्थिती स्थिर आणि नियंत्रणात आणण्यापलीकडे गेली आहे. आमच्याकडे सीमेवरील मुद्द्यांसाठी वेगळे मॅकेनिज्म आहे. आम्ही सैन्य आणि कूटनीतिकच्या माध्यमातून चर्चा सुरू ठेवतोत. आम्ही या प्रकरणाला चांगल्या पद्धतीने सोडवण्यास प्रतिबद्ध आहोत.

तणाव कमी करण्यासाठी भारताकडे प्रस्ताव

सूत्रानुसार, भारत चीनसमोर पेंगॉन्ग सो, गालवन घाटी आणि डेमचोकमध्ये दोन्ही सैन्यामध्ये तणाव कमी करण्याचा प्रस्ताव दिला. मागील एका महिन्यापासून याच परिसरातील सैनिकांमध्ये बाचाबाची होत आहे.

0