आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • India China Moscow PacT | India China Ladakh Standof Latest News Updates | Indian Army And People Liberation Army Fired 100–200 Rounds On Pangong

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लडाखमधील तणाव वाढला:भारत-चीनमधील मॉस्को करार होण्यापूर्वी पँगोंग भागात गोळीबार, दोन्ही बाजूने 100-200 राउंड फायर

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 10 सप्टेंबर रोजी मॉस्को येथे भारत आणि चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी 5 मुद्द्यांवर सहमती दर्शविली होती
  • 29-30 ऑगस्टच्या रात्री चीनी सैन्याने पँगोंग सो सरोवर क्षेत्रातील एक टेकडी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला

10 सप्टेंबर रोजी मॉस्को येथे भारत-चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीपूर्वी लडाखमध्ये भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये गोळीबार झाला होता. इंग्रजी वृत्तपत्र इंडियन एक्सप्रेसने सूत्रांचा हवाल्याने ही माहिती दिली आहे. यानुसार पूर्व लडाखमधील पँगोंग सो सरोवराच्या उत्तर टोकाला दोन्ही बाजूंनी 100 ते 200 गोळ्या हवेत झाडण्यात आल्या होत्या. फिंगर -3 आणि फिंगर -4 क्षेत्र एकत्रित असलेल्या रेजलाइनवर ही घटना घडली.

भारत-चीन सैनिक काही भागात अवघ्या 300 मीटर अंतरावर आहेत

मिळालेल्या माहितीनुसार सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पँगोंग सो तलावाच्या उत्तरेकडील आणि दक्षिणेकडील भागात बर्‍याच हालचाली झाल्या. तेथे अनेक वेळा गोळीबारही झाला. तणाव अजूनही कायम आहे. चुशुल सेक्टरमधील बर्‍याच ठिकाणी भारत आणि चीनची सैन्ये एकमेकांपासून अवघ्या 300 मीटर अंतरावर तैनात आहेत. दरम्यान, दोन्ही देशांच्या लष्कराच्या अधिकाऱ्यांशी नव्याने चर्चा केली जाणार आहे.

यापूर्वी 7 सप्टेंबर रोजी भारत-चीनदरम्यान मुकपरी हाइट्स परिसरात गोळीबार झाल्याची घटना समोर आली होती. 45 वर्षानंतर एलएसीवर गोळीबार झाला होता. दोघांनीही यासाठी एकमेकांना जबाबदार धरले होते. दरम्यान, पँगोंग क्षेत्रात गोळीबार झाल्याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.

चीनने 5 दिवसांत 3 वेळा घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला

29-30 ऑगस्टच्या रात्री चीनी सैन्याने पँगोंग तलावाच्या दक्षिणेकडील टेकडी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला, परंतू भारतीय सैनिकांनी त्यांचा हा डाव उधळून लावला. त्यानंतर, सैन्य अधिकार्‍यांमधील चर्चेची एक फेरी सुरू झाली, पण त्यानंतरच्या 4 दिवसांत चीनने पुन्हा दोन वेळा घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला.

10 सप्टेंबर रोजी भारत-चीन परराष्ट्र मंत्र्यांनी मॉस्कोमध्ये सीमा विवाद शांततेत सोडविण्यासाठी बैठक घेतली. डिस-इंगेजमेंटसह 5 मुद्यांवर त्यावर सहमती दर्शविली. दरम्यान, चीन वारंवार वादग्रस्त भागात घुसण्याचा प्रयत्न करत आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीही मंगळवारी संसदेत सांगितले की चीनने एलएसीवर सैन्य आणि दारुगोळा जमा केला आहे, परंतु भारतही त्यांना प्रत्युत्तर देण्यास सज्ज आहे.