आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • India China | Narendra Modi Prime Minister Office Statement On 19th June All Party Meeting Over India China Ladakh Border Face Off

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चीनवरील मोदींच्या वक्तव्यानंतर वाद:पीएमओचे स्पष्टीकरण- पंतप्रधानांच्या वक्तव्याला चुकीच्या पद्धतीने सादर करुन वाद निर्माण केला जात आहे, त्यांनी 15 जूनबाबत भाष्य केले होते

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • नरेंद्र मोदींनी शुक्रवारी सर्वपक्षीय बैठकीत म्हटले होते- भारतीय सीमेत घुसखोरी झालीच नाही
  • विरोधकांनी विचारले- घुसखोरी झाली नाही, तर मग मारामारीत आपले 20 जवान शहीद का झाले ?

चीनच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वक्तव्यानंतर वाद सुरू झाल्यावर पंतप्रधान ऑफिस (पीएमओ) ने शनिवारी स्पष्टीकरण दिले आहे. पीएमओने म्हटले की, नरेंद्र मोदींच्या वक्तव्याला चुकीच्या पद्धतीने सादर करुन, वाद निर्माम केला जात आहे.

पंतप्रधान काय म्हणाले होते ?

शुक्रवारी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत मोदी म्हणाले होते की, 'लड्डाखच्या सीमेत कोणतीच घुसखोरी झाली नाही आणि आपल्या पोस्टवरही कोणी कब्जा केला नाही.'

विरोधकांनी काय म्हटले ?

काँग्रेस नेते पी चिदंबरम म्हणाले की- पंतप्रधानांचे हे विधान खरे आहे, तर मग भारताचे 20 जवान शहीद कसे झाले ? दोन्ही देशात चर्चा का होत आहेत ? दुसरीकडे, राहुल गांधींनी अशाच प्रकारचे प्रश्न विचारले. त्यांनी हेदेखील म्हटले की, पंतप्रधानांनी चीनच्या हल्ल्यापुढे सरेंडर केले आहे.

पीएमओचे स्पष्टीकरण

सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधानांनी 15 जूनच्या मारामारीचा रेफरेंस दिला होता. त्यांच्या म्हणण्याचा अर्थ असा होता की, सैनिकांच्या शौर्यामुळे भारताच्या सीमेत कोणीच घुसले नाही. आपल्या सैनिकांनी प्राण देऊन चीनी सैनिकांना हुसकून लावले.

बातम्या आणखी आहेत...