आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • India China Row, Chinese Fighter Jets Continue Attempts To Provoke India On LAC In Ladakh

LAC वर चीनची भारताला चिथावणी:पूर्व लडाखमध्ये चिनी लढाऊ विमानांचे उड्डाण, भारतीय हवाई दल सतर्क

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कॉर्प्स कमांडर स्तरावरील चर्चेच्या अनेक फेऱ्यांनंतरही चीन आपल्या कारवाया थांबवत नसल्याचे पाहायला मिळत आहे. चीनची लढाऊ विमाने पूर्व लडाखमध्ये भारतीय सैन्याला चिथावणी देण्याचा प्रयत्न करत आहेत. गेल्या तीन ते चार आठवड्यांपासून चीनची लढाऊ विमाने नियमितपणे LACच्या जवळून उड्डाण करत आहेत. त्याचबरोबर भारतीय हवाई दलाचे जवानही चीनच्या प्रत्येक हालचालीवर बारीक लक्ष ठेवून आहेत.

भारतीय हवाई दलही चीनच्या या खेळीला चोख प्रत्युत्तर देत आहे. यासोबतच या प्रकरणात कोणताही धोका निर्माण होऊ नये यासाठी हवाई दल सतर्क झाले आहे.

हवाई दलाकडून मिग-29 आणि मिराज 200 सारखी लढाऊ विमाने तैनात

मीडिया रिपोर्ट्समध्ये सरकारी सूत्रांचा हवाला देत चीनच्या J-11 सह अनेक लढाऊ विमाने LAC जवळ उड्डाण करत असल्याचे सांगण्यात आले. त्याचवेळी, अलीकडेच यामध्ये 10 किमीच्या कॉन्फिडन्स बिल्डिंग मेजर लाइनचे उल्लंघन केल्याचे प्रकरण देखील समोर आले आहे. याचे प्रत्युत्तर म्हणून, भारतीय हवाई दलाने मिग-29 आणि मिराज 2000 सह सर्वात शक्तिशाली लढाऊ विमाने विकसित तळांवर तैनात केली आहेत. चीनने भारताचे नुकसान करण्याचा प्रयत्न केला तर ही लढाऊ विमाने काही क्षणांत चीनच्या कारवायांना प्रत्युत्तर देऊ शकतात.

लडाख सेक्टरमध्ये भारतीय हवाई दलाच्या पायाभूत सुविधांच्या उभारणीवरून पीपल्स लिबरेशन आर्मी तणावात असल्याचे दिसते. या उभारणीमुळे भारतीय हवाई दलाला चीनच्या कारवायांवर लक्ष ठेवणे सोपे होणार आहे. या पायाभूत सुविधांच्या निर्मितीद्वारे हवाई दल त्यांच्या नियंत्रणाखालील भागात चिनी हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवू शकते.

24 जूनपासून चीनच्या ढाऊ विमानांचे सीमेवर उड्डाण

24-25 जूनच्या सुमारास चीनकडून भारतीय सैन्याला भडकावण्याचे प्रयत्न सुरू झाले. दरम्यान, पूर्व लडाखमध्ये एका चिनी लढाऊ विमानाने भारतीय सैनिकांच्या अगदी जवळून उड्डाण केले. त्यानंतर चुमार सेक्टरजवळील LAC वर दोन्ही बाजूंमध्ये कॉन्फिडन्स बिल्डिंग मेजर लाइनचे अनेक वेळा उल्लंघन झाले आणि तेव्हापासून हे प्रकरण सुरु आहे. विशेष म्हणजे याच महिन्यात 17 जुलै रोजी दोन्ही देशांदरम्यान कॉर्प्स कमांडर चर्चा झाली होती. यानंतरही चीन आपल्या कारवायांपासूनहटत नसल्याचे दिसून येत आहे.

बातम्या आणखी आहेत...