आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • India China Standoff| Indian Defence Forces To Stock Weapons For 15 Day Intense War.

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चीन-पाकसाठी भारत सज्ज:15 दिवसांच्या युद्धासाठी हत्यार आणि दारुगोळा साठवत आहे सैन्य, 50 हजार कोटींची शस्त्रे खरेदी केली जाऊ शकतात

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पाकिस्तान आणि चीन या दोन्ही देशांशी सामना करण्याची तयारी

सीमेवर चीनबरोबर सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने एक मोठे पाऊल उचलले आहे. 15 दिवसांच्या युद्धानुसार सरकारने तिन्हीही सैन्यांना दारुगोळा आणि शस्त्रे गोळा करण्यास परवानगी दिली आहे. आतापर्यंत सैन्याने दहा दिवसांच्या युद्धाच्या हिशोबाने शस्त्रे गोळा केली आहेत.

पूर्व लडाखमधील वास्तविक नियंत्रण रेषेत (एलएसी) परिस्थिती पाहता हा निर्णय खूप महत्वाचा मानला जात आहे. यामुळे सैन्याला आवश्यकतेनुसार स्टॉक व एमरजेंसी फायनेंशियल पावरचा वापर करता येईल. देशाव्यतिरिक्त परदेशातून 50 हजार कोटींची शस्त्रे खरेदी करण्याची योजना आहे.

पाकिस्तान आणि चीन या दोन्ही देशांशी सामना करण्याची तयारी
सरकारच्या सूत्रांनी सांगितले की, शत्रूंसोबत 15 दिवस युद्ध लढण्यासाठी शस्त्रे आणि दारू गोळा जमा करण्यात येत आहे. पाकिस्तान आणि चीन यांच्याबरोबर युद्धासाठी सैन्य एकाच वेळी तयार करणे हा याचा उद्देश आहे.

उरी हल्ल्यानंतर गरज वाटली
त्यांनी सांगितले की, काही काळापूर्वी हा साठा वाढवण्यासाठी सैन्याला परवानगी देण्यात आली होती. अनेक वर्षांपूर्वी अशी तयारी करण्यात आली होती की, सैन्याजवळ 40 दिवसांच्या लढाईसाठी रिसोर्ट उपलब्ध राहतील. शस्त्रे आणि दारुगोळा साठवणुकीशी संबंधित आव्हाने आणि बदलत्या परिस्थितीमुळे ते 10 दिवसांवर आणले गेले.

उरी हल्ल्यानंतर असे वाटले की युद्धासाठी सैन्यात फारच कमी राखीव साठा आहे. तत्कालीन संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सैन्य, नौदल आणि हवाई दलाचे व्हाइस चीफ यांच्या खरेदीचे हक्क 100 कोटींवरून 500 कोटींवर वाढवले ​​होते.

सैन्याला 300 कोटींच्या इमरजेंसी फायनेंशियल पावर
या तिन्ही सैन्यांना आवश्यक उपकरणे खरेदी करण्यासाठी 300 कोटी रुपयांची आपत्कालीन फायनेंशियल पावर देण्यात आली होती. तेव्हा हे लक्षात आले की युद्धाच्या स्थितीत याचा वापर केला जाऊ शकतो. सद्यस्थितीत सैन्य शस्त्रे व क्षेपणास्त्र यंत्रणेची खरेदी करत आहे, जेणेकरून परिस्थिती बिघडल्यास दोन्ही मोर्चांवर प्रभावी कारवाई करता येईल.

सूत्रांनुसार सैन्याची चिंता कमी करण्यासाठी टँक आणि तोफखान्यासाठी मोठ्या संख्येत मिसाइल आणि दारूगोळ्यांसाठी व्यवस्था करण्यात आली आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser