आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअरुणाचलच्या तवांगमध्ये झालेल्या चकमकीनंतर जेव्हा चिनी सैनिक पळून गेले तेव्हा त्यांनी आपले बरेच सामान मागे तसेच टाकत पळ काढला. भारतीय जवानांनी चकमकीच्या ठिकाणाहून स्लीपिंग बॅग आणि इतर उपकरणे आणि साहित्य जप्त केले आहे. त्याचा फोटोही समोर आला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ज्या स्लीपिंग बॅग सापडल्या आहेत त्या थंड तापमानात किंवा खुल्या जागेत राहण्यास मदत करतात.
तवांगच्या यांगत्से येथील तात्पुरत्या भिंतीवरील तारकुंपण तोडून 600 चिनी सैनिकांनी भारतीय हद्दीत प्रवेश करण्याचा प्रयत्न करताच भारतीय जवानांनी त्यांना चोख प्रत्युत्तर देत त्यांचा पिटाळून लावले.
दरम्यान, हवाई दल 15-16 डिसेंबर रोजी LAC वर युद्ध सराव करेल. यामध्ये राफेल, सुखोईसह फ्रंटलाइन लढाऊ विमानांचा सहभाग असेल. ते 48 तास ईशान्येतील तेजपूर, जोरहाट, चाबुआ आणि हाशिमारा एअरबेसवरून उड्डाण करतील. हा युद्ध सराव आधीच ठरल्याचे बोलले जात आहे.
लढाऊ विमानांनी 3 वेळा चीनच्या ड्रोनची घुसखोरी रोखली
तवांगमध्ये भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये चकमक झाल्यानंतर भारतीय हवाई दलाने (IAF) अरुणाचल सीमेवर लढाऊ हवाई गस्त सुरू केली आहे. तवांगमधील चकमकीपूर्वीही चीनने अरुणाचल सीमेवर आपले ड्रोन पाठवण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर, भारतीय वायुसेनेने तातडीने आपले लढाऊ विमान अरुणाचल सीमेवर तैनात केले होते.
गेल्या वर्षीही 200 चिनी सैनिकांनी घुसखोरीचा प्रयत्न केला होता
गेल्या वर्षी याच भागात 200 चिनी सैनिकांनी घुसखोरीचा प्रयत्न केला होता. तेव्हाही भारतीय जवानांनी तो हाणून पाडला होता. त्यानंतर गस्तीदरम्यान दोन्ही देशांचे सैनिक सीमेवरील वादावरून आमनेसामने आले आणि काही तास हा प्रकार चालला. मात्र, यामध्ये भारतीय जवानांना कोणतीही हानी झाली नाही आणि प्रोटोकॉलनुसार चर्चेने वाद मिटवण्यात आला.
गलवानमध्ये चकमक झाली, आपले 20 शहीद झाले, चीनचे 38 मारले गेले
15 जून 2020 रोजी लडाखच्या गलवान खोऱ्यात दोन्ही सैन्यात झालेल्या चकमकीत 20 भारतीय जवान शहीद झाले, तर 38 चिनी सैनिक मारले गेले. मात्र, चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने केवळ 4 सैनिक मारले गेल्याचे मान्य केले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.