आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पारंपरिक शस्त्रांच्या आधारे ड्रॅगनला घडवली अद्दल:'त्रिशूळ', 'वज्र' आणि 'Sapper Punch' ला घाबरून पळाले चिनी सैनिक

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तवांगमध्ये झालेल्या चकमकीनंतर भारत आणि चीनमध्ये तणावाचे वातावरण आहे. दोन्ही देशांदरम्यान आतापर्यंत चर्चेच्या अनेक फेऱ्या पार पडल्या आहेत. मात्र, चीनच्या आडमुठेपणामुळे समस्यांवर तोडगा निघालेला नाही. तवांगमध्ये घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या भारतीय जवानांनी 600 चिनी सैनिकांनी पळवून लावले. शत्रूंना हुसकावून लावण्यासाठी जवानांनी वापरलेली शस्त्रे चर्चेत आली आहेत.

तवांग चकमकीनंतर पुन्हा एकदा त्रिशूळ, वज्र, सॅपर पंच ही शस्त्रे चर्चेत आहेत. या हत्यारांमुळे कुणाचाही मृत्यू होणार नाही. तसेच कुणी गंभीररीत्या जखमीही होणार नाही. मात्र जेव्हा कधी हातघाईची झटापट होईल तेव्हा ही हत्यारे काही सेकंदात शत्रूला गारद करू शकतील. कारण, 1996 मध्य चीन आणि भारत यांच्यात झालेल्या सामंजस्य करारानुसार दोन्ही देशांचे सैनीक सीमेवर स्फोटक शस्त्रांचा वापर करत नाहीत.

पारंपारिक शस्त्रांद्वारे प्रेरित गैर प्राणघातक असणारी त्रिशूळ, वज्र, सॅपर पंच, दंड आणि भद्रा यांसारख्या शस्त्रास्त्रांची निर्मिती नोएडास्थित एपेस्टेरॉन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी केली आहे. दिव्य मराठीने कंपनीचे संचालक मोहित कुमार यांच्याशी चर्चा केली. त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला की ही शस्त्रे कशी काम करतात? जुन्या काळातील युद्धात वापरल्या जाणार्‍या शस्त्रास्त्रांसारखे ते का दिसत होते? ते कोणत्या तंत्रज्ञानाने सुसज्ज आहेत? या प्रश्नांना मोहित कुमार यांनी सविस्तर उत्तरे दिली. त्याबद्दल वाचुयात...

वज्र आणि सॅपर पंचची खासियत...

हा व्रज आहे, जो भारतीय सैनिक आता वापरत आहेत. भारतीय जवानांनी चिनी सैनिकांना धक्के देऊन त्यांचा पाठलाग केला होता.
हा व्रज आहे, जो भारतीय सैनिक आता वापरत आहेत. भारतीय जवानांनी चिनी सैनिकांना धक्के देऊन त्यांचा पाठलाग केला होता.

वज्र: व्रज स्टेनलेस स्टीलचा बनलेला आहे. त्यातील 75 टक्के विद्युत प्रवाह हा शत्रूला झटका देतो. 1 तास चार्ज केल्यानंतर तो आठ तास वापरला जाऊ शकतो. याचे वजन फक्त दोन ते अडीच किलो आहे. अशा स्थितीत भारतीय जवानांना ते हातात धरून वापरण्यास कोणतीही अडचण येत नाही. याचा वापर करून शत्रूला पळवून लावणे शक्य आहे. उणे तापमानात ते अधिक प्राणघातक असतात.

मोहित यांनी हातात सॅपर पंच घातलेला आहे. हा सॅपर पंच एक शक्तिशाली इलेक्ट्रिक शॉक देतो.
मोहित यांनी हातात सॅपर पंच घातलेला आहे. हा सॅपर पंच एक शक्तिशाली इलेक्ट्रिक शॉक देतो.

सॅपर पंच: खास प्रकारचे ग्लव्हज विकसित करण्यात आले आहेत. त्यांचे नाव सॅपर पंच आहे. हे ग्लव्हज हातात घालून समोरील व्यक्तीवर मारल्यास विजेचा धक्का बसतो. त्यामुळे समोरील व्यक्ती बेशुद्ध पडू शकते. तसेच थंडीच्या दिवसांत यांचा हातमोजे म्हणूनही वापर होऊ शकतो. यात अंगठा आणि बोट यांच्यामध्ये स्विचेस आहेत, जे मुठ दाबल्यावर सक्रिय होतात आणि ज्या व्यक्तीला ठोसा लागतो त्याला विजेचा धक्का बसतो. शत्रूला या धक्क्यातून सावरण्याची संधी मिळत नाही. हे सॅपर पंच वजनानेदेखील हलके आहेत.

हा फोटो त्रिशूल शस्त्राचा आहे. हे खास भारतीय सैनिकांसाठी तयार करण्यात आली आहे. ते लवकरच सीमेवर पाठवला जाईल.
हा फोटो त्रिशूल शस्त्राचा आहे. हे खास भारतीय सैनिकांसाठी तयार करण्यात आली आहे. ते लवकरच सीमेवर पाठवला जाईल.

त्रिशूळ : कंपनीकडून एक त्रिशूळ तयार करण्यात आला आहे. या माध्यमातून शत्रूच्या वाहनांना आपल्या क्षेत्रात घुसखोरी करण्यापासून रोखण्यासाठी तसेच सैनिकांचा सामना करण्यासाठी मदत होणार आहे.
त्रिशूळमधअये व्होल्टेज जरा जास्त आहे. याचे वजन सुमारे 4 किलो आहे. चिनी सैनिकांना धडा शिकवण्यासाठी फक्त 500 ग्रॅमची काठी पुरेशी आहे. आता त्याचा वापर होत नाही. लवकरच ते सीमेवर पोहोचवले जाईल. त्याच स्वरूपाचा एक लहान दांडादेखील आहे. चिनी सैनिकांना धडा शिकवण्यासाठी फक्त 500 ग्रॅमचा हा दांडा पुरेसा आहे. सध्या त्याचा वापर होत नाही. लवकरच ते सीमेवर पोहोचवले जाईल.

हा फोटो सॅपर शील्डचा आहे, जी भारतीय सैनिकांना चिनी सैनिकांच्या हल्ल्यापासून वाचवते.
हा फोटो सॅपर शील्डचा आहे, जी भारतीय सैनिकांना चिनी सैनिकांच्या हल्ल्यापासून वाचवते.

सॅपर शील्ड संपूर्ण शरीर झाकते
मोहितने सांगितले की सॅपर शील्ड हे तंत्रज्ञानाचे एक उदाहरण आहे. यात व्होल्टेजसह एलईडी फोकस लाइट आहे. याद्वारे संपूर्ण शरीर झाकता येते. याचा वापर सीमेवर होत आहे. यासोबत लेव्हल-3ए स्टॅब व्हेस्ट हे बुलेट प्रूफ जॅकेट देखील आहे. साधारण दोन किलो वजनाचे हे जॅकेट लवकरच सीमेवरील सैनिक वापरणार आहे.

ही सहा शस्त्रे शत्रूंला अद्दल घडवण्यासाठी उपयोगी.
ही सहा शस्त्रे शत्रूंला अद्दल घडवण्यासाठी उपयोगी.

या शस्त्रांची गरज का होती?
15 जून 2020 रोजी लडाखच्या गलवान खोऱ्यात दोन सैन्यांमध्ये झालेल्या चकमकीत 20 भारतीय जवान शहीद झाले होते. तर चीनचे सुमारे 38 सैनिकही मारले गेले. मात्र, चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने केवळ 4 सैनिक मारले गेल्याचे मान्य केले होते.

मोहितने सांगितले की, चकमकीत चिनी सैनिकांनी नियम आणि कायदे डोळ्यासमोर ठेऊन जवानांवर लोखंडी रॉड, काटेरी तारांनी हल्ला केला होता. या घटनेतून धडा घेत भारतीय लष्कराने स्वत:ला पारंपारिक शस्त्रांनी सुसज्ज करण्याचा निर्णय घेतला. म्हणजेच अशा आघाड्यांवर जिथे गोळीबार करण्याची परवानगी नाही आणि शत्रूचे सैनिक समोरासमोर आले तर त्यांना प्रत्युत्तर देता येईल. हे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवून पारंपरिक शस्त्रे विकसित करण्यात आली. यानंतर ते सीमेवरील भारतीय जवानांना पुरवण्यात आले. आता या शस्त्रांमध्ये अधिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.

चीन सीमेवरील परिस्थिती नियंत्रणात

तवांग संघर्ष प्रकरणी लष्कराकडून अधिकृत वक्तव्य आले आहे. पूर्व लष्कराचे कमांडर लेफ्टनंट जनरल आरपी कलिता यांनी सांगितले की, चीन सीमेवर परिस्थिती सामान्य आहे. बुमला भागात झालेल्या चकमकीसंदर्भात फ्लॅग मीटिंग झाली. यामध्ये दोन्ही देशांचे कमांडर उपस्थित होते. आरपी कलिता म्हणाले की, आम्ही शांतता आणि युद्ध अशा दोन्ही परिस्थितीत देशाचे रक्षण करण्यासाठी सदैव तयार आहोत. तवांगमधील परिस्थिती आता पूर्णपणे नियंत्रणात आहे. संपुर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

चीन चकमकीनंतर भारताच्या ब्रह्मास्त्राची चाचणी

अरुणाचल प्रदेशातील तवांग क्षेत्रात चीनच्या घुसखोरीनंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांच्या गर्जनांमुळे गुरुवारी प्रत्यक्ष नियंत्रण रेषा (एलएसी) थरथरली. हवाई दलाच्या दोनदिवसीय लष्करी कवायतींच्या प्रारंभीच राफेल आणि सुखोई या लढाऊ विमानांसह अत्याधुनिक हेलिकॉप्टर शिनूक आणि अपाचे यांची ताकद व तयारी जोखण्यात आली. हवाई दलाने पश्चिम बंगालपासून ते अरुणाचल प्रदेशपर्यंतच्या संपूर्ण परिसरात युद्धाभ्यास करण्यात येत आहे. लढाऊ ‌िवमानांच्या या कवायती तवांग क्षेत्रात सुमारे ३०० चीनी सैनिकांच्या घुसखोरीनंतर सुरु झाल्या. हाशिमारा तळावरून लढाऊ जेट विमानांनी उड्डाण केले. तेजपूर, जोरहाट, पानागढ आणि छाबुआ तळांवरही या कवायती करण्यात आल्या. शुक्रवारीही या कवायती सुरु राहतील. संपुर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

बातम्या आणखी आहेत...