आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • India China Tension Update: Indian Navy Deployed Marine Commandos (MARCOS) Pangong TSO Lake

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लडाखमध्ये चीनची घेराबंदी:पँगॉन्गमध्ये आता नेव्हीचे मार्कोस कमांडो तैनात, आर्मी आणि एअरफोर्स कमांडो पहिल्यापासूनच हजर

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आतापर्यंत लडाखमध्ये सैन्य आणि एअरफोर्सची हालचाल सुरू होती. आता नौदलही यात सामील झाले आहे.

पूर्व लडाखमधील पँगॉन्ग लेकजवळ नौदलाने आपला सर्वात धोकादायक मार्कोस कमांडो तैनात केले आहेत. मार्कोस हे दाढीवाले फोर्स म्हणून देखील ओळखले जाते. या भागात हवाई दलाचे सैन्य व पॅरा स्पेशल फोर्सचे गरुड कमांडो आधीच अस्तित्वात आहेत. दरम्यान, पूर्व लडाखमध्ये चीनबरोबर सुरू असलेला तणाव संपवण्यासाठी भारत वाटाघाटी करीत आहे. मात्र, चीनचे डावपेच लक्षात घेता येथे शक्तीही वाढवली जात आहे.

सरकारच्या सूत्रांनी सांगितले की लडाखमध्ये मार्कोस तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे जेणेकरुन लडाखमधील कठीण परिस्थितीत तिन्ही दलातील बेस्ट कमांडो ताळमेळ बसवू शकतील. या तैनातून मार्कोसला अत्यंत थंड वातावरणात ऑपरेशन करण्याचा अनुभव मिळेल.

चीनी सैन्यासमोर तैनात झाले मार्कोस कमांडो
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी एप्रिलपासून भारतीय व चिनी सैन्य ज्या भागात आमने-सामने आहेत. त्याच भागात मार्कोस कमांडो तैनात करण्यात आले आहेत. नौदल कमांडोनाही लवकरच तलावामध्ये ऑपरेशनसाठी नवीन बोट मिळणार आहे.

गरुड कमांडो, पॅरा स्पेशल फोर्स आधीच हजर
आतापर्यंत लडाखमध्ये सैन्य आणि एअरफोर्सची हालचाल सुरू होती. आता नौदलही यात सामील झाले आहे. लष्कराची पॅरा स्पेशल फोर्सेस आणि कॅबिनेट सचिवालयातील विशेष फ्रंटियर फोर्स लाइन ऑफ एक्चुअल कंट्रोलवर (एलओसी) तैनात आहेत. त्याच वेळी परिस्थिती बिघडल्यावर हवाई दलाच्या विशेष गरुड कमांडोला रणनीतिकदृष्ट्या महत्त्वाच्या शिखरावर तैनात केले होते. हे कमांडो IGLA एअर डिफेन्स सिस्टमसह सुसज्ज आहेत.

IGLA एक शोल्डर फायर्ड सिस्टम आहे. हे खांद्यावर ठेवून शत्रू विमानांना लक्ष्य केले जाऊ शकते. ते घेऊन जाण्याचा उद्देश असा होता की चीनी लढाऊ विमान किंवा इतर विमानांनी भारतीय हद्दीत प्रवेश करण्याचा प्रयत्न करु नये.

स्पेशल फोर्सनेच शिखरांवर कब्जा केला होता
पूर्व लडाखमध्ये सैन्य आणि हवाई दलाच्या दोन्ही तुकड्या 6 महिन्यांहून अधिक काळापासून कार्यरत आहेत. 29-30 ऑगस्ट रोजी, सैन्य दलाने विशेष दलाच्या मदतीने एलओसीवरील महत्त्वपूर्ण शिखरांवर ताबा मिळवला होता. दुसरीकडे, चीननेही एलएसीवर आपले विशेष सैन्य तैनात केले आहे.

काश्मीरमध्येही नेव्ही कमांडो तैनात करण्यात आले
जम्मू-काश्मीरमधील दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी भारतीय नौदलानेही वुलर लेक भागात मार्कोस तैनात केले आहेत. 2016 च्या पठाणकोट हल्ल्यानंतर हवाई दलाने गरुड कमांडोना काश्मीर खोऱ्यात तैनात करण्यास सुरुवात केली, जेणेकरून त्यांना ग्राउंड ऑपरेशनचा अनुभव मिळेल. हा तत्कालीन लष्कर प्रमुख आणि आता संरक्षण प्रमुख जनरल बिपिन रावत यांच्या योजनेचा भाग होता.

गरुड कमांडोने दहशतवाद्यांच्या गटाचा सफाया केला
गरुड टीमने काश्मीरमध्ये तैनात झाल्यानंतर लवकरच आपले सामर्थ्य सिद्ध केले. त्यांनी दहशतवाद्यांचा एक पूर्ण गट नष्ट केला. मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या कटात सामील झहीर उर रेहमान लखवीचा पुतण्या या दहशतवादी गटाचे नेतृत्त्व करत होता.

दहशतवाद्यांचा खात्मा करण्याच्या या ऑपरेशनसाठी गरुड फोर्सला एक अशोक चक्र, तीन शौर्य चक्र आणि इतर अनेक शौर्य पुरस्कार प्राप्त झाले. त्या कारवाईनंतर वायुसेना सातत्याने गरुड संघांना काश्मीरमध्ये तैनात करण्यासाठी पाठवत आहे. येथे सैन्यात अनेक विशेष बटालियनही आहेत. या सैन्याने 2016 मध्ये पाकिस्तानमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक केला होता.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser