आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • India Closed During The Day, Shah Met Farmers At Night; Meeting Again Unsuccessful

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शेतकरी आंदोलनाचा 13 वा दिवस:दिवसा भारत बंद, रात्री शेतकऱ्यांना भेटले शहा; बैठक पुन्हा निष्फळ, आज होणारी 6 वी बैठक स्थगित

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सरकार आज दुरुस्ती प्रस्ताव देणार, पण शेतकरी कायदा रद्द करण्याबाबत ठाम

नव्या कृषी कायद्यांविरोधातील ‘भारत बंद’ला संमिश्र प्रतिसाद मिळाला. सर्वच ठिकाणी शेतकऱ्यांची निदर्शने शांततेत पार पडली खरी; पण राजकीय पक्षांनी केलेला गुंता सुटला नाही.

केंद्रीय गृहमंत्री अिमत शहा यांनी दुपारी ४ वाजता शेतकऱ्यांना चर्चेसाठी निमंत्रण दिले. केंद्रीय कॅबिनेटची बुधवारी बैठक असून या बैठकीनंतर सरकार कायद्यातील दुरुस्तीचा लेखी प्रस्ताव आणण्याची शक्यता आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांच्या बैठकीकडे लक्ष लागून होते. दरम्यान, शेतकरी मात्र कायदा रद्द करण्याच्या मागणीवर ठाम आहेत. शहा यांच्यासोबतच्या बैठकीसाठी ५ शेतकरी नेत्यांना बोलावण्यात आले. नंतर १३ नेते भेटले. बैठक आधी शहा यांच्या निवासस्थानी ठरली होती. ऐनवेळी ती आयसीएआर गेस्ट हाऊसमध्ये झाली. शहा यांनी अनेक तज्ज्ञांना बैठकीसाठी बोलावले होते. कोणते बदल केल्यास त्याचे भविष्यात काय परिणाम होतील ते तज्ज्ञ शेतकऱ्यांना समजावून सांगत होते. तरीही शेतकरी नेते आक्षेप घेत होते. त्यामुळेच सूचनांनुसार मध्यममार्गी तोडगा काढण्याचा प्रयत्न निष्फळ ठरला.

...अनेक ठिकाणी रेल्वे रोखल्या, नेते ताब्यात
- दिल्ली- बंद संमिश्र होता. सीएम केजरीवालांना नजरकैदेत ठेवल्याचा आपचा आरोप पोलिसांनी फेटाळला.
- बिहार- विरोधकांनी राज्यात चक्का जाम केला तसेच रेल्वेही रोखल्या.
- पंजाब- सत्ताधारी काँग्रेसचे समर्थन. आंदोलकांनी दुकाने बंद केली. मोहाली-चंदीगड महामार्ग बंद होता.
- छत्तीसगड- शेतकरी व काँग्रेस नेत्यांनी रस्त्यावर उतरून व्यापाऱ्यांना दुकाने बंद करण्याचे आवाहन केले.
- हरियाणा- ग्रामीण भागात बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, तर शहरांमध्ये संमिश्र प्रतिसाद होता.शेतकऱ्यांनी महामार्गावर आंदोलन करत चक्का जाम केला.
- यूपी- प्रयागराजमध्ये रेल्वे रोखल्या. सपाचे अनेक नेते पोलिसांच्या ताब्यात.
- राजस्थान- जयपूरमध्ये एनएसयूआय कार्यकर्त्यांकडून भाजप कार्यालयास घेरण्याचा प्रयत्न. काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांत दगडफेक.

झारखंड : एमएसपीची हमी देण्याची तयारी
रांची | कृषी कायद्यांविरोधात झारखंडमध्ये सुधारित विधेयक आणले जाईल. पंजाब, छत्तीसगड आणि राजस्थाननंतर असे करणारे झारखंड चौथे राज्य असेल. दुरुस्तीनंतर पीक खरेदीवेळी शेतकऱ्याला एमएसपीपेक्षा कमी भाव दिल्यास किमान तीन वर्षांची शिक्षा होईल. राज्याचे कृषिमंत्री बादल पत्रलेख म्हणाले, ‘केंद्राच्या कायद्यांमुळे आगामी काळात शेतकरी मजूर होईल. यामुळे आम्ही एमएसपी कायद्याच्या कक्षेत आणत आहोत.’

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser