आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 3945 रुग्ण आढळले आहेत. हे गेल्या दोन दिवसांपासून चार हजारांच्या जवळपास राहिले आहेत. यापूर्वी गुरुवारी 4041 केसेस समोर आल्या होत्या. गेल्या तीन महिन्यांतील हा उच्चांक आहे. यापूर्वी 11 मार्च रोजी 4194 रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता.
शुक्रवारी, 2672 रुग्ण बरे झाले, तर 26 संक्रमित लोकांचा मृत्यू झाला. सध्या 2162 रुग्ण उपचार घेत आहेत. देशात आतापर्यंत 4.32 कोटी लोक कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत. त्यापैकी 4.26 कोटी बरे झाले आहेत. 5.24 लाखांना आपला जीव गमवावा लागला आहे.
पाच राज्यांमध्ये देखरेख आवश्यक
आरोग्य मंत्रालयाने 3 जून रोजी राज्य सरकारांना पत्र पाठवले आहे. या पत्रानुसार, महाराष्ट्र, तेलंगणा, केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडू या पाच राज्यांना वाढत्या कोरोनाचे रुग्ण रोखण्यासाठी नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यास सांगितले आहे. मंत्रालयाने या राज्यांना कोरोनाच्या संसर्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी “कठोर दक्षता बाळगण्यास आणि पूर्वीप्रमाणेच कारवाई” करण्यास सांगितले आहे.
विमान प्रवाशांसाठी मास्क अनिवार्य करा
विमान प्रवासी मास्क आणि इतर कोरोना नियमांसह नियमांचे पालन करतात की नाही याची खात्री करण्याचे निर्देश दिल्ली उच्च न्यायालयाने दिले आहेत. जे नियम पाळत नाहीत, त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, दंड करावा आणि अशा प्रवाशांना नो-फ्लाय लिस्टमध्ये टाकावे, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे.
महाराष्ट्रात पॉझिटिव्हिटी रेट 8 टक्क्यांहून अधिक
यापूर्वीच्या लाटेतही महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण होते. यावेळीही महाराष्ट्रातील वाढत्या केसेसमुळे लोकांची चिंता वाढली आहे. या वेळी साप्ताहिक पॉझिटिव्हिटी रेट 8% पेक्षा जास्त आहे. म्हणजेच, प्रत्येक 100 चाचण्यांमध्ये 8 लोक पॉझिटिव्ह येत आहेत. राजधानी मुंबईत एप्रिलच्या तुलनेत मे महिन्यात हॉस्पिटलायझेशन दरात 231% वाढ झाली आहे.
राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी राज्यात कोरोनाचे 1134 नवीन रुग्ण आढळले आहेत. ५६३ बरे झाले असून ३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या 5 हजार 127 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत येथे 78 लाख 90 हजार 346 बाधित झाले आहेत. 77 लाख 37 हजार 355 बरे झाले आहेत आणि 1 लाख 47 हजार 864 जणांचा मृत्यू झाला आहे.
दिल्लीत कोरोना नियंत्रण
शुक्रवारी दिल्लीत ३४५ नवे रुग्ण आढळले, तर ३८९ लोक बरे झाले. चांगली बातमी अशी आहे की एकही मृत्यू झालेला नाही. आता येथे 1446 बाधितांवर उपचार सुरू आहेत. दिल्लीत आतापर्यंत 19 लाख 7 हजार 982 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 26 हजार 212 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.
केरळमध्ये केसेस कमी
शुक्रवारी केरळमध्ये कोरोनाचे 1278 नवीन रुग्ण आढळले आहेत. 743 संक्रमित बरे झाले, तर 6 रुग्णांचा मृत्यू झाला. आता ६ हजार ६४२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. याच्या एक दिवस आधी म्हणजेच गुरुवारी 1370 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. राज्यात आतापर्यंत 65 लाख 60 हजार 901 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी 64 लाख 83 हजार 623 बरे झाले आहेत, तर 69 हजार 773 जणांचा मृत्यू झाला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.