आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशात कोरोनामुळे गेल्या 24 तासांमध्ये 673 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.या दरम्यान संक्रमणाचे 18,573 नवीन केस समोर आले आहेत. गेल्या एका आठवड्यात कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू शनिवारी नोंदवण्यात आले होते. देशातील पाच राज्यांमध्ये कोरोना रुग्ण कमी झाले आहेत. मात्र मृतांच्या संख्येत वाढ झाली आहे.
महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत कोरोनामुळे 29 जणांचा मृत्यू झाला आहे. या दरम्यान 1635 नवीन रुग्ण आढळले आहेत. राज्यात गेल्या आठवडाभरात शनिवारी सर्वाधिक मृत्यूची नोंद झाली आहे. शुक्रवारी राज्यात 15 जणांना आपला जीव गमवावा लागला असून 2068 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत 143,576 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
देशातील कोरोनाची आकडेवारी
राहत फतेह अली खान कोरोना पॉझिटिव्ह
पाकिस्तानी वंशाचा गायक राहत फतेह अली खान यांना कोरोनाची लागण झाली आहे. अधिकृत ट्विटर हँडलवरून दिलेल्या माहितीमध्ये असे म्हटले आहे की, अहवाल आल्यानंतर त्यांचे सर्व कार्यक्रम 15 मार्चपर्यंत री-शेड्यूल करण्यात आले आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.