आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • India Corona News And Updates 9th May 2021, Lockdown In Many States And UT's Due To Corona, Coronavirus Outbreak India Cases, Vaccination , Death Toll LIVE Update

कोरोना देशात:सलग चौथ्या दिवशी 4 लाखांपेक्षा जास्त नवीन रुग्ण आढळले, तर 4,091 रुग्णांचा मृत्यू

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मागील चोवीस तासात सर्वाधिक 3.86 रुग्ण ठीक झाले

देशातील कोरोनाची दुसरी लाट अजूनच भयंकर होताना दिसत आहे. मागील चार दिवसांपासून दररोज चार लाखांपेक्षा जास्त रुग्ण सापडत आहेत. गेल्या चोवीस तासात देशभरात 4 लाख 3 हजार 626 नवीन रुग्णांची नोंद झाली असून, 4,091 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ही आपल्या सर्वांसाठी चिंतेची बाबत आहे. दरम्यान, दिलासादायक बाब म्हणजे, 3 लाख 86 हजार 207 रुग्ण ठीकही झाले आहेत. हा एका दिवसांत ठीक होणारा रुग्णांचा सर्वात मोठा आकडा आहे.

देशातील कोरोनाची आकडेवारी

  • मागील 24 तासातील नवीन रुग्णसंख्या: 4.03 लाख
  • मागील 24 तासातील मृत्यू: 4,091
  • मागील 24 तासात ठीक झालेले रुग्ण: 3.86 लाख
  • आतापर्यंतचे एकूण संक्रमित: 2.22 कोटी
  • आतापर्यंत ठीक झालेले रुग्ण: 1.83 कोटी
  • आतापर्यंत झालेले एकूण मृत्यू: 2.42 लाख
  • सध्या उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या: 37.32 लाख

15 राज्यात लॉकडाऊनसारखे निर्बंध
देशातील 14 राज्यांमध्ये पूर्ण लॉकडाउनसारखे निर्बंध लावण्यात आले आहेत. यात हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, छत्तीसगड, ओडिशा, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ आणि मिजोरम सामील आहेत.

16 राज्य/केंद्र शासित प्रदेशांमध्ये अंशतः लॉकडाउन
देशातील 17 राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये अंशतः लॉकडाउन आहे. यात जम्मू-कश्मीर, लद्दाख, उत्तराखंड, अरुणाचल प्रदेश, सिक्किम, मेघालय, नगालैंड, असम, मणिपुर, त्रिपुरा, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, तेलंगाना, तमिळनाडु, गोवा आणि गुजरात सामील आहे.

बातम्या आणखी आहेत...