आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • India Corona News And Updates, Vaccination Updates, Over 2 Crore Patient Defeats Corona In The Country

अक्षय्य आशेचे 2 कोटी दीप:देशात कोरोनाला हरवणारे 2 कोटींपार, रोज बरे होणारे सरासरी रुग्ण 20 दिवसांत दुप्पट

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • आता नव्या रुग्णांपेक्षा कोरोनामुक्तांचा आकडा वाढणार, शुभ मुहूर्तावर शुभ वर्तमान
  • तरीही सावधगिरी गरजेची : 7 दिवसांत जगात सर्वाधिक मृत्यू भारतात

यंदा अक्षय्य तृतीयेचा शुभ मुहूर्त देशाच्या अक्षय्य आशेचे प्रतीक बनून समोर आला आहे. कोरोनाला हरवणााऱ्या रुग्णांची संख्या गुरुवारी २ कोटींच्या पार गेली. दुसरीकडे संसर्गाचा दर दाखवणारा रिप्रॉडक्शन रेटही (आर फॅक्टर) एप्रिलमधील यंदाची सर्वोच्च पातळी १.४६ वरून घसरून १.१४ झाला आहे. जगात सध्या नेपाळमध्ये सर्वात जास्त १.६१ आर फॅक्टर आहे.

कोरोना क्विक अपडेट
रोजच्या नव्या रुग्णांची सरासरी सध्या 3.76 लाख आहे. मात्र रोज बरे होणाऱ्यांची सरासरी 3.51 लाख आहे. लवकरच सरासरी रिकव्हरी नव्या रुग्णांपेक्षाही जास्त असेल. विशेष म्हणजे, सरासरी अॅक्टिव्ह रुग्णांमध्ये 25 एप्रिलपासून सातत्याने घट होत आहे.

बातम्या आणखी आहेत...