आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोनाचा स्फोट:1 दिवसात 2.5 लाख रुग्ण,  देशात 24 तासांत संसर्ग झालेले रुग्ण 27 टक्क्यांनी वाढले

नवी दिल्ली9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • गंभीर लक्षणे नसतील तर रुग्णालयातून तिसऱ्या दिवशी सुटी : केंद्र सरकार

देशात रोज आढळणाऱ्या रुग्णांची संख्या आता घाबरून टाकणारी आहे. बुधवारी एका दिवसात २.४७ लाखांहून अधिक रुग्ण आढळले. हे धक्कादायक यामुळे की, एक दिवस आधी मंगळवारी १,९४,७२० नवे रुग्ण आढळले होते. म्हणजे एका दिवसात कोरोना रुग्णसंख्येने ५२ हजारांहून अधिक (२७%) उसळी घेतली आहे. अर्थात, बुधवारी मृत्यू मात्र काही प्रमाणात कमी झाले. एक दिवसात देशात ३८१ मृत्यू झाले. मंगळवारी ही संख्या ४४२ होती. बुधवारी सक्रिय रुग्णांची संख्या वाढून ११,०८,३८९ झाली. यापूर्वी देशात १७ एप्रिल २०२१ रोजी अडीच रुग्ण नोंदवले गेले होते. म्हणजे सुमारे ९ महिन्यांनी भारतात पुन्हा एकदा एवढे रुग्ण आढळले.

बुधवारी दिल्लीतही कोरोना काळातील सर्वाधिक २७,५६१ रुग्ण आढळले. यापूर्वी २० एप्रिल २०२१ रोजी २८,३९५ रुग्ण होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी सायंकाळी ४.३० वाजता विविध मुख्यमंत्र्यांशी चर्चा करतील. दरम्यान, केंद्राने कोरोना उपचारांसाठी नवे निर्देश काढले असून आता गंभीर लक्षणे नसतील तर रुग्णास तिसऱ्या दिवशी रुग्णालयातून सुटी दिली जाणार आहे.

मंत्रालयाचा इशारा : ओमायक्रॉन सर्दी नव्हे, निष्काळजीपणा नको, सतर्क राहा
ओमायक्रॉन साधे सर्दी-पडसे नसल्याचा इशारा आरोग्य मंत्रालयाने दिला आहे. यामुळे निष्काळजीपणा दाखवू नये, सतर्क राहावे. ओमायक्रॉन ओळखण्यासाठी रॅपिड अँटिजन टेस्ट केली पाहिजे. मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल म्हणाले, नव्या गाइडलाइनअंतर्गत किरकोळ लक्षणे असलेल्या रुग्णंाना पॉझिटिव्ह आल्याच्या ७ दिवसांनी डिस्चार्ज दिला जाऊ शकतो. ऑक्सिजन दिल्याविना ३ दिवस ऑक्सिजन पातळी ९३% राहिलेल्यांनाही सुटी दिली जाऊ शकते.

नवा शोध: हवेच्या संपर्कात २० मिनिटांतच विषाणू संसर्गाची क्षमता गमावून बसतो
कोविड व्हायरस हवेच्या संपर्कात आल्याच्या २० मिनिटांत इतरांना संक्रमित करण्याची क्षमता ९०% पर्यंत गमावतो, असे युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिस्टल एअरोसोल रिसर्च सेंटरने नव्या अभ्यासात सांगितलेे. मनुष्याचे तोंड वा नाकातून निघाल्यानंतर विषाणू ५ मिनिटांपर्यंत अॅक्टिव्ह असतो. याच वेळेत तो इतरांना बाधित करू शकतो. अभ्यासाचे लेखक प्रो. जोनाथन रीड यांनी म्हटले की, एखाद्या ठिकाणी व्हेंटिलेशन नसेल तर नक्कीच बाधा होईल.

बातम्या आणखी आहेत...