आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारत सध्या कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेत घायाळ असताना तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. केंद्र सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार के. विजयराघवन यांनी याबाबत सजग केले आहे. विजयराघवन बुधवारी म्हणाले, दुसरी लाट इतकी घातक आणि भयंकर असेल, याचा अंदाज नव्हता. दुसऱ्या लाटेत ज्या वेगाने विषाणूचा फैलाव होत आहे, ते पाहता काेरोना महामारीची तिसरी लाट येणे अटळ आहे. मात्र ती कधी येईल, तिचे रूप कसे असेल, हे आताच सांगता येणार नाही. भारताने नव्या लाटांसाठी आताच सज्ज व्हावे. पहिल्या लाटेत व्हायरसमध्ये दोन म्युटेशन दिसले. गतवर्षी ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या दुसऱ्या लाटेत त्यात नाट्यमय बदल दिसते. युकेसारखा नवा व्हेरियंट समोर आला. आरोग्य मंत्रालयानुसार, महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ आणि यूपीसह १२ राज्यांत रुग्णांची संख्या १ लाखापेक्षा जास्त आहे. देशातील ७०.९१% रुग्ण महाराष्ट्र, यूपी, दिल्ली, कर्नाटक, केरळ, हरियाणा, बंगाल, तामिळनाडू, आंध्र आणि राजस्थानात आहेत.
नवी रुग्णसंख्या स्थिरावतेय
महाराष्ट्रात नवीन रुग्णवाढीचा दर कमी झाला आहे. काही दिवस रुग्णसंख्या ६३ हजार ते ६५ हजार दरम्यान होती. मागील ३-४ दिवसांपासून यात सातत्याने घट होत आहे. कडक निर्बंधांमुळे अनावश्यक प्रवास टाळणे. बाजारपेठांमधील गर्दीला आळा बसल्याने रुग्णवाढीचे प्रमाण कमी होत असल्याचे दिसून येत आहे.
वैद्यकीय सुविधांत वाढ
राज्य तिसऱ्या लाटेला सामोरे जाण्यासाठी आवश्यक उपाय करत आहे. आरोग्य व्यवस्था बळकटीकरणावरही भर देत आहे. राज्यात आजघडीला ४ लाख ४६,६३९ आयसोलेशन बेड्स, ऑक्सिजनसह १ लाख बेड्स, ३०,४१९ आयसीयू बेड्स आणि जवळपास १२,१७९ व्हेंटिलेटर्स उपलब्ध करण्यात आले आहेत.
काेराेना प्राण्यांपासून पसरत नाहीय, मानवापासून मानवालाच लागण : पॉल
काेराेना व्हायरसचा फैलाव प्राण्यांपासून होत नसल्याचे नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी सांगितले अाहे. त्याचा संसर्ग मानवापासून मानवापर्यंत होत असल्याचे पॉल यांनी स्पष्ट केले आहे. लोकांवर टेलीकन्स्टल्टेशनने उपचार करावा, असे आवाहन त्यांनी डॉक्टरांना केले. त्यांनी काेराेना प्राेटाेकाॅलचे पालन करावे, मास्क वापरावा, डिस्टन्सिंगचे पालन, स्वच्छता, अनावश्यक गर्दी न करावी, तसेच घराबाहेर न पडण्याचा सल्ला नागरिकांना दिला.
देशात कोरोना विषाणूच्या सध्याच्या व्हेरियंट्सविरुद्ध लसीची मात्रा प्रभावी
के. विजयराघवन म्हणाले की, काेराेना विषाणूच्या सध्याच्या व्हेरियंट्सवर लस प्रभावी अाहे. भारतासह जगभरात नवीन व्हेरियंट्स समोर येतील. मात्र त्यात अधिक संसर्गजन्य व्हेरियंट्सचे प्रमाण जास्त असेल. डबल म्युटंटची निगराणी व लस अपडेट करणे गरजेचे आहे. लस व इतर स्थितीच्या मुकाबल्यासाठी धोरणात बदल गरजेचा आहे. लोकांची बेपर्वाई, पहिल्या लाटेत लोकांमध्ये कमी रोगप्रतिकार विकसित झाल्यामुळे दुसऱ्या लाटेने देशात हाहाकार उडवला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.