आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • National
 • India Corona Outbreak News And Updates, The Central Government Should Ban All Major Ceremonies In The Country For 1 Year

तिसरी लाट रोखायची असेल तर तज्ज्ञांचे ऐका...:देशात सर्व मोठ्या समारंभांवर केंद्र सरकारने 1 वर्षासाठी बंदी घालावी

नवी दिल्ली(पवनकुमार)एका महिन्यापूर्वी
 • कॉपी लिंक
 • सभा व धार्मिक कार्यक्रमांवरच नव्हे, पार्ट्या-लग्न समारंभांवरही बंदी असावी
 • निवडणूक काळात एकट्या प. बंगालमध्ये नवे रुग्ण १०२ पट वाढले

देश सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी लढत आहे आणि आतापासूनच तिसऱ्या लाटेच्या शक्यतेवर चर्चा सुरू झाली आहे. फक्त सरकारच नव्हे, तर न्यायालयही त्याबाबत चिंतित आहे. महामारीशी संबंधित तज्ज्ञ म्हणतात की, तिसरी लाट केव्हा येईल आणि येईल की नाही याबाबतची भविष्यवाणी सध्या केली जाऊ शकत नाही. पण लोकांनी आणि सरकारने आपापली भूमिका योग्य पद्धतीने बजावली तर कदाचित तिसरी लाट येण्याआधीच ती रोखली जाईल एवढे मात्र निश्चित.

राष्ट्रीय कोविड कृती दल-कोविड १९ चे सदस्य प्रा. के. श्रीनाथ म्हणाले की, तिसऱ्या लाटेसारखी स्थितीच येऊ नये यासाठी सामान्य लोकांनी नियमांचे पालन करावे आणि सरकारनेही पुढील एक वर्षापर्यंत देशात सर्व मोठ्या कार्यक्रमांवर पूर्णपणे बंदी घालावी. सभा आणि धार्मिक कार्यक्रमांवरच नव्हे, तर मोठमोठ्या पार्ट्या आणि लग्न समारंभांवरही पूर्णपणे बंदी घालावी. तसे केल्यास संसर्गाचा वेग तर कमी होईलच, शिवाय यादरम्यान मोठ्या संख्येत लसीकरण करून लोकांना सुरक्षित केले जाऊ शकते. गेल्या आठवड्यात देशात तिसरी लाट अपरिहार्य असल्याचे सांगणारे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार के. विजयराघवन यांच्या मतेही, आपण कठोर पावले उचलली तर काही ठिकाणी तिसरी लाट न येण्याची शक्यता आहे. ती कुठेच न येण्याचीही शक्यता आहे. आपण दिशानिर्देशांचे किती चांगल्या प्रकारे पालन करतो यावर ते अवलंबून आहे. इन्स्टिट्यूट ऑफ जिनोमिक्स अँड इंटिग्रल बायोलॉजीचे संचालक डॉ. अनुराग अग्रवाल म्हणाले की, या वर्षाच्या सुरुवातीला लोकांनी हलगर्जीपणा केला, त्याचा परिणामही समोर आहे. आपण अजूनही कोविडच्या नियमांची कठोर अंमलबजावणी केली आणि मोठ्या प्रमाणात लोकांचे लसीकरण करू शकलो तर तिसरी लाट कमी घातक असण्याची शक्यता आहे.

अमेरिका-ब्रिटनच्या मते, इंडियन व्हेरिएंट लसीला न जुमानण्याची शक्यता... डब्ल्यूएचओही सहमत होण्याची शक्यता
डब्ल्यूएचओच्या प्रमुख वैज्ञानिक सौम्या स्वामिनाथन यांच्या मते, कोरोनाचा व्हेरिएंट बी.1.617 चा भारतात महामारीच्या सद्य:स्थितीत मोठा हात आहे. तो इंडियन व्हेरिएंट या नावानेही ओळखला जात आहे. सतत म्युटेशन्समुळे डब्ल्यूएचओने या व्हेरिएंटला ‘व्हेरिएंट ऑफ इंटरेस्ट’च्या श्रेणीत ठेवले आहे. अमेरिका आणि ब्रिटन त्याला ‘व्हेरिएंट ऑफ कन्सर्न’ मानत आहेत. जे मूळ विषाणूपेक्षा जास्त धोकादायक, जास्त संक्रामक आहेत आणि लसीलाही जुमानत नाहीत,अशा व्हेरिएंटसाठी ही श्रेणी आहे. लवकरच डब्ल्यूएचओही त्याच्याशी सहमत होऊ शकते. या व्हेरिएंटचे काही म्युटेशन्स जास्त संक्रामक आहेत आणि लस किंवा नैसर्गिकरीत्या तयार झालेल्या अँटिबॉडीजलाही प्रतिरोध करत आहेत.तज्ज्ञांचे मत-विषाणूचा एखादा नवा व्हेरिएंट आला तरच तिसरी लाट शक्य
वर्धमान महावीर मेडिकल कॉलेज, सफदरजंग रुग्णालयाचे कम्युनिटी मेडिसिनचे प्रमुख प्रा. डॉ. जुगलकिशोर यांच्या मते, राष्ट्रीय स्तरावर तिसऱ्या लाटेची स्थिती कठीण आहे. एक ते दीड महिन्यात संसर्ग ईशान्य भारताकडे जाईल. दिल्ली, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश यांसारख्या राज्यांत पुन्हा अशी स्थिती असणार नाही. आता विषाणूचा एखादा नवा व्हेरिएंट आला तरच तिसरी लाट येऊ शकते.

 • 9.14 लाखांना पडली ऑक्सिजनची गरज
 • 4.93 लाख लोक आयसीयूत आतापर्यंत
 • 3,54,59,119 लोकांनाच आतापर्यंत लसीचे दोन्ही डोस देण्यात आले.
 • 13,39,80,544 लोकांना फक्त एक डोस देण्यात आला आहे.
 • १३० कोटींच्या लोकसंख्येत फक्त ३.५४ कोटींना दोन्ही डोस
बातम्या आणखी आहेत...