आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
 • Marathi News
 • National
 • India Corona Outbreak In India: In 24 Hours 2.48 Lakh Patients Ar Found In Country; Active Cases Are 67,660; Covid 19 News And Live Updates

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिलासा देणारी बातमी:देशात गेल्या 24 तासांत 2.48 लाख रुग्ण बरे झाले; सक्रिय प्रकरणात 67,660 ने वाढ; 14 दिवसांतील सर्वात कमी आकडा

नवी दिल्ली20 दिवसांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • देशात एका दिवसांत रेकार्ड ब्रेक 2 लाख 48 हजार रुग्ण उपचार घेत बरे झाले आहे.

देशात कोरोना महामारीच्या दुसर्‍या लाटेमुळे नवीन रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या चोवीस तासांत देशात 3 लाख 19 हजार नवीन रुग्ण आढळले असून यामध्ये 2 हजार 762 लोकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, देशातून दिलासा देणारी बातमी समोर येत आहे. देशात एका दिवसांत रेकार्ड ब्रेक 2 लाख 48 हजार रुग्ण उपचार घेत बरे झाले आहे.

विशेष म्हणजे सक्रिय रुग्णांचा आकडादेखील कमी होताना दिसत आहे. काल सोमवारी सक्रिय रुग्णांच्या संख्येत 67 हजार 660 ने वाढ झाली असून हा गेल्या 14 दिवसांतील सर्वात कमी आकडा असल्याचे मानले जात आहे.यापूर्वी 12 एप्रिल रोजी सक्रिय रुग्णांच्या संख्येत 63 हजार 065 ने वाढ झाली होती.

देशात कोरोना महामारीचे आकडे

 • मागील 24 तासात एकूण नवीन केस : 3.19 लाख
 • मागील 24 तासात एकूण मृत्यू : 2,762
 • मागील 24 तासात एकूण बरे झालेले रुग्ण : 2.48 लाख
 • आतापर्यंत एकूण संक्रमित : 1.76 कोटी
 • आतापर्यंत एकूण बरे झाले : 1.45 कोटी
 • आतापर्यंत एकूण मृत्यू : 1.97 लाख
 • सध्या उपचार सुरु असलेले एकूण रुग्ण : 28.75 लाख
बातम्या आणखी आहेत...