आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

कोरोनावर मात शक्य आहे:1 कोटी रिकव्हरी, सुरुवातीचे 50 लाख रुग्ण बरे होण्यास 219 दिवस लागले, यानंतरचे 50 लाख केवळ 33 दिवसांत बरे

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • भारतात रिकव्हरी दर आणि मृत्युदर जगाच्या तुलनेत चांगला

काेरोना विषाणू संसर्ग वेगाने वाढत असला तरीही हा अजिंक्य नाही. कोरोनावर मात करणे शक्य आहे. जगभरात कोरोनातून पूर्णपणे बरे झालेल्या ९८ लाखांपेक्षा जास्त रुग्णांनी हे सिद्ध केले आहे. जगभरात दररोज सुमारे दोन लाख रुग्ण बरे होत आहेत. अशा स्थितीत रविवारी जगात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या एक कोटींच्या पुढे जाईल. रुग्ण बरे होण्याचा हा दर कोरोना संसर्ग आणि मृत्यूंच्या तुलनेत अधिक आहे, ही दिलासादायक बाब आहे. संसर्गाचे प्रमाण १०.५% आणि मृत्यूचे सरासरी प्रमाण ५.६% आहे. बरे होऊन घरी परतणाऱ्या रुग्णांची संख्या १३% च्या दराने वाढत आहे. आठ महिन्यांत जगभरात १.६० कोटी लोकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे, परंतु सध्या उपचार घेणाऱ्या सक्रिय रुग्णांची संख्या केवळ ६२ लाख आहे.

भारतात रिकव्हरी दर आणि मृत्युदर जगाच्या तुलनेत चांगला
जगभरात कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ६१.१% आहे, तर मृत्युदर ४% आहे. भारतात रुग्ण बरे होण्याचा दर ६३.५ टक्के आहे. येथे एकूण १३.३६ लाख रुग्णांपैकी ८.४९ लाख रुग्ण बरे झाले आहेत. भारतातील मृत्युदर जगाच्या तुलनेत २.३% कमी आहे, हे दिलासादायक आहे.