आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना देशात:24 तासात 14402 सक्रिय रुग्ण कमी झाले, सध्या 3.82 लाख रुग्णांवर उपचार सुरु, हा आकडा मागील साडेचार महिन्यात सर्वात कमी

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोमवारी, देशात कोरोनाच्या प्रकरणांमध्ये मोठी घट झाली. गेल्या 24 तासांत 27,421 नवीन रुग्ण आढळून आले तर 41,457 रुग्ण बरे झाले. 376 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला. अशा प्रकारे, सक्रिय प्रकरणांची संख्या म्हणजेच उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 14,402 ने कमी झाली आहे. सध्या 3.82 लाख रुग्णांवर उपचार सुरु आहेत. हा आकडा 23 मार्चनंतर सर्वात कमी आहे. तेव्हा 3.65 लाख ऍक्टिव्ह केसेस होत्या.

काल आढळून आलेली 27,421 नवीन प्रकरणे 15 मार्चनंतर सर्वात कमी आहेत. 15 मार्च रोजी एका दिवसात 24,437 प्रकरणे नोंदवण्यात आली होती. त्यानंतर, देशात कोरोना प्रकरणांमध्ये सातत्याने वाढ झाली. दुसऱ्या लाटेदरम्यान, दररोज 3 लाखांहून अधिक लोकांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला.

देशात कोरोना महामारीचे आकडे

  • मागील 24 तासात आढळून आलेले एकूण रुग्ण : 27,421
  • मागील 24 तासात बरे झालेले एकूण रुग्ण : 41,457
  • मागील 24 तासात एकूण मृत्यू : 376
  • आतापर्यंत एकूण संक्रमित: 3.19 कोटी
  • आतापर्यंत एकूण बरे झालेले रुग्ण : 3.11 कोटी
  • आतापर्यंत एकूण मृत्यू : 4.28 लाख
  • सध्या उपचार सुरु असलेल्या एकूण रुग्णांची संख्या : 3.82 लाख
बातम्या आणखी आहेत...