आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना देशात:मागील 24 तासात 91,211 नवीन रुग्ण आढळून आले, 1.33 लाख रुग्ण बरे झाले आणि 3,401 संक्रमितांचा मृत्यू

10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोना संक्रमितांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. गुरुवारी देशातील 91,211 रूग्णांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला तर 1 लाख 33 हजार 598 लोक बरे झाले. 3,401 जणांचा मृत्यू झाला. सलग चौथ्या दिवशी नवीन संसर्ग झालेल्यांची संख्या एक लाखाहून कमी राहिली.

10 जून रोजी, 45,542 सक्रिय प्रकरणे, म्हणजेच, उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या कमी झाली आहेत. जवळपास महिनाभरापासून यामध्ये घट होणे सुरू आहे. यापूर्वी 12 मे रोजी 6,399 ची वाढ नोंदली गेली होती. सध्या देशात 11 लाख 19 हजार 928 रूग्णांवर उपचार सुरू आहेत. 9 मे रोजी हा आकडा 37 लाख 41 हजार 302 च्या पुढे होता.

देशात कोरोना महामारीचे आकडे

  • मागील 24 तासात एकूण नवीन केस - 91,211
  • मागील 24 तासात एकूण बरे झालेले रुग्ण - 1.33 लाख
  • मागील 24 तासात एकूण मृत्यू - 3,401
  • आतापर्यंत एकूण संक्रमित रुग्ण - 2.91 कोटी
  • आतापर्यंत बरे झालेले रुग्ण - 2.76 कोटी
  • आतापर्यंत एकूण मृत्यू - 3.59 लाख
  • सध्या उपचार सुरु असलेल्या एकूण रुग्णांची संख्या - 11.65 लाख
बातम्या आणखी आहेत...