आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना देशात:37645 नवीन रुग्ण आढळून आले, 39674 बरे झाले तर 720 रुग्णांचा मृत्यू, महारष्ट्रात 2165 सक्रिय रुग्ण वाढले, यामध्ये 2 दिवसापासून होत आहे वाढ

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

देशात रविवारी 37,645 लोकांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला.. या दरम्यान, 39,674 लोक बरे झाले तर 720 लोकांचा संसर्गामुळे मृत्यू झाला. अशाप्रकारे, सक्रिय प्रकरणांच्या म्हणजेच उपचार घेत असलेल्या रूग्णांच्या संख्येत 2,759 घट नोंदली गेली. परंतु महाराष्ट्रात सक्रिय प्रकरणांचा ट्रेंड स्थिर दिसून येत आहे. अशा परिस्थितीत आता येथे लवकरच नवीन प्रकरणे वाढण्याची शक्यता दिसून येत आहे. रविवारी राज्यात सक्रिय प्रकरणांमध्ये 2,165 घटनांची नोंद झाली. दोन दिवसांपासून येथे ही आकडेवारी वाढत आहे. शनिवारी त्यात 1,769 ने वाढ झाली होती.

देशात कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांचा आकडा तीन कोटींच्या पुढे गेला आहे. रविवारी रात्रीपर्यंत 3 कोटी 7 हजार लोक रिकव्हर झाले आहेत. परंतु सक्रिय रुग्ण कमी होण्याची गती मंदावली आहे. सलग 6 दिवस, सक्रिय प्रकरणांमध्ये 5 हजारांपेक्षा कमी घट दिसून येत आहे. 5 जुलै रोजी 18 हजारांहून अधिक सक्रिय प्रकरणे कमी झाली होती.

देशातील कोरोना महामारीचे आकडे

  • मागील 24 तासात आढळळून आलेले एकूण नवीन रुग्ण : 37,645
  • मागील 24 तासात बरे झालेले रुग्ण : 39,674
  • मागील 24 तासात एकूण मृत्यू : 720
  • आतापर्यंत संक्रमित झालेले रुग्ण 3.08 कोटी
  • आतापर्यंत बरे झालेले रुग्ण : 3 कोटी
  • आतापर्यंत एकूण मृत्यू : 4.08 लाख
  • सध्या उपचार सुरु असलेल्या रुग्णांची संख्या : 4.45 लाख
बातम्या आणखी आहेत...