आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

देश कोरोना:देशातील रुग्णसंख्या 9 लाख पार: फक्त 3 दिवसांत 1 लाख रुग्ण वाढले, दररोज सर्वाधिक रुग्ण वाढण्याच्या बाबतीत भारत जगातील दुसरा देश

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • तीन राज्यांत देशातील 58% पेक्षा जास्त प्रकरणे

देशामध्ये कोरोनाव्हायरस संक्रमणाची वाढती गती पाहून पुन्हा एकदा चिंता वाढली आहे. सोमवारी देशातील कोरोना बाधितांचा आकडा 9 लाख पार झाला. यावेळी रूग्णांची संख्या 8 ते 9 लाख होण्यास अवघ्या तीन दिवसांचा कालावधी लागला. देशात कोरोनामुक्तांचा आकडा 5 लाख पार गेला आहे. आतापर्यंत कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या लोकांपैकी 62% पेक्षा जास्त लोक बरे होऊन घरी गेले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे कोरोना रुग्ण बरे होण्याचा वेग सातत्याने वाढत आहे.  

एक वाईट बातमी अशीही आहे की आता अमेरिकेनंतर भारत हा जगातील दुसरा देश बनला आहे, जिथे दररोज सर्वाधिक प्रमाणात पॉझिटिव्ह रुग्णसंख्या वाढत आहे. आतापर्यंत अमेरिकेनंतर ब्राझीलमध्ये सर्वाधिक प्रकरणे येत होती. अमेरिकेत सरासरी सरासरी 40 हजार प्रकरणे वाढत आहेत, तर भारतात दररोज 25 हजार नवीन प्रकरणे समोर येत आहेत. 

तीन राज्यांत देशातील 58% पेक्षा जास्त प्रकरणे 

महाराष्ट्र, तमिळनाडू आणि दिल्ली या तीन राज्यांत देशातील 58.73% संक्रमित आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक 29.93%, तमिळनाडूत 15.86% आणि दिल्लीत 12.94% प्रकरणे आहेत. देशातील 2015 देशांतील 202 असे देश आहेत जिथे महाराष्ट्र राज्यापेक्षा कमी रुग्ण आहेत. केवळ 13 देशांत महाराष्ट्रापेक्षा जास्त लोक संक्रमित आहेत.

अर्ध्याहून अधिक रुग्ण बरे झाले, 2.67% रुग्णांचा मृत्यू 

देशातील कोरोना रुग्णांची संख्या 9 लाखांपेक्षा जास्त झाली आहे. यातील 5.60 लाखांपेक्षा अधिक लोक बरे झाले आहेत. 3.5 लाख रुग्णांवर उपचार सुरू असून 2.67% रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेतील मृत्यूदर सर्वाधिक 4.28% आहे. ब्राझीलमध्ये आतापर्यंत 3.98% रुग्णांचा बळी गेला आहे. 

0