आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

देशात कोरोना:रुग्णांचा आकडा 72 लाखांच्या पुढे, 24 तासात 63 हजार संक्रमित वाढले. 73 हजार रुग्ण बरे झाले

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशात कोरोना रुग्णांचा आकडा 72 लाखांच्या पुढे गेला आहे. 9 कोटींपेक्षा जास्त लोकांची तपासणी झाली आहे. यामध्ये 72 लाख 37 हजार 82 लोक संक्रमित आढळून आले आहेत. मागील 24 तासात 63 हजार 520 लोकांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

दिलासादायक गोष्ट म्हणजे रिकव्हरी रेट वाढत आहे. आतापर्यंत 87% म्हणजे 62 लाख 98 हजार 695 लोक बरे झाले आहेत. मंगळवारी 73 हजार 903 लोकांना डिस्चार्ज देण्यात आला. 11.69% ऍक्टिव्ह केस आहेत. सर्वात जास्त 25% ऍक्टिव्ह केस महाराष्ट्र, 13% कर्नाटक आणि 11% केरळमध्ये आहेत.

कोरोना संक्रमणामुळे आतापर्यंत 1 लाख 10 हजार 617 लोकांचा मृत्यू झाला आहे. मागील 24 तासात 723 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकड्यानुसार मृत्यू झालेले सर्वात जास्त रुग्ण कोमॉर्बिड होते. म्हणजेच असे रुग्ण ज्यांना पूर्वीपासूनच कँसर, शुगर, ह्रदय, श्वसनाशी संबंधित गंभीर आजार होते. डेथ रेट 1.53% आहे. यामध्ये 17.9% रुग्ण कोमॉर्बिड होते.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser