आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थोडा दिलासा:रुग्ण वेगाने वाढले, मात्र मृत्युदर रोखण्यात यश, स्वदेशी लस पहिल्या चाचणीत यशस्वी

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • प्रारंभीच्या तुलनेत कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण कमी झाले

भारत शनिवारी सायंकाळपर्यंत कोरोनामुळे मृतांची संख्या ५० हजार पार करेल. देशात आता रोज ९०० पेक्षा जास्त मृत्यू होऊ लागले आहेत. ही सरासरी अमेरिका आणि ब्राझीलच्या समान आहे. मात्र, भारतात ज्या वेगाने रुग्ण वाढले, त्या वेगाने मृत्यू वाढले नाहीत, ही दिलासादायक गोष्ट आहे. म्हणजे देशात पहिले १० हजार मृत्यू १६ जूनपर्यंत झाले होते. तेव्हा एकूण ३.५४ लाख रुग्ण होते. म्हणजे यातील २.८२% रुग्णांचा मृत्यू झाला होता. मात्र, मागील १० हजार मृत्यू ५.९६ लाख रुग्णांमधून झाले. म्हणजे केवळ १.६८% रुग्ण वाचवता आले नाहीत. मृत्यूबाबत वाईट स्थिती महाराष्ट्राची आहे. तेथे देशातील २२% रुग्ण असून मृत्यू ३८% झाले आहेत. गुजरातमध्ये देशाच्या ३% रुग्ण आहेत. मात्र मृत्यू ६% झाले आहेत.

जगात आता सर्वाधिक रुग्ण भारतातच आढळू लागले आहेत
- भारतात गुरुवारी एकूण ६९७१२ रुग्ण आढळले होते, तर अमेरिका आणि ब्राझीलमध्ये अनुक्रमे ५५३६४ आणि ५९१४७ रुग्ण आढळले. मात्र, या दोन्ही देशात मृत्यू भारतापेक्षा जास्त झाले.
- १ आठवड्याच्या सरासरीनुसार भारतात अमेरिका, ब्राझीलपेक्षा जास्त रुग्ण आढळले. भारतात रोज सरासरी ६६ हजार रुग्ण आढळले, तर अमेरिकेत ५२ हजार व ब्राझीलमध्ये ४२ हजार आढळले.

मृत्युदराची मोजणी अशी का?
भारतात ७०% रुग्ण बरे झाले आहेत, १.९% वाचले नाहीत. म्हणजे ७२% प्रकरणे निकाली निघाली आहेत. २८% सक्रिय रुग्ण आहेत. रोज सुमारे १० हजार सक्रिय रुग्ण वाढत आहेत, यामुळे एकूण रुग्णांमध्ये गणना करताना मृत्युदर रोज घटतो. मात्र मृत्यू घटत नाहीत. निकाली निघालेल्या प्रकरणांच्या हिशेबाने मृत्युदर २.८% आहे.

स्वदेशी लस पहिल्या चाचणीत यशस्वी
नवी दिल्ली| देशात तयार केली जाणारी कोविड-१९ लस कोव्हॅक्सिन पहिल्या चाचणीत सुरक्षित असल्याचे सिद्ध झाले आहे. सप्टेंबरमध्ये दुसरी चाचणी सुरू होऊ शकते. ही लस भारत बायोटिक आयसीएमआर आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी एकत्रितपणे तयार करत आहेत. सरकारने सांगितल्यानुसार, पहिल्या टप्प्यातील मानवी चाचणीत लस सुरक्षित असल्याचे समोर आले आहे. २०२१ च्या मध्यात लस येण्याची आशा आहे.

बातम्या आणखी आहेत...