आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना देशात:मागील 24 तासात 2.63 लाख नवीन रुग्ण, 4.22 लाख बरे झाले, एका दिवसात सर्वात जास्त 4,334 मृत्यूही झाले

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशातील कोरोनाच्या दुसर्‍या लाटेची तीव्रता कमी होऊ लागली आहे. मागील 24 तासात देशामध्ये 2 लाख 63 हजार 21 जण कोरोना संक्रमित आढळून आले. हा सलग दुसरा दिवस होता, जेव्हा एकाच दिवसात 3 लाखांपेक्षा कमी संक्रमित आढळून आले. यापूर्वी रविवारी 2.82 लाख लोकांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता.

सोमवारी देशात कोरोनाचे 3 रेकॉर्ड झाले. गेल्या 24 तासांत 4 लाख 22 हजार 391 लोकांनी कोरोनावर मात केली. एका दिवसात कोरोनामधून बरे होणारी ही सर्वात मोठी संख्या आहे. यापूर्वी 8 मे रोजी 3.86 लाख लोक बरे झाले होते.

अशाप्रकारे, गेल्या 24 तासांत, सक्रिय रुग्णांची संख्या म्हणजेच उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या रेकॉर्डमध्ये 1.63 लाखांची घट झाली आहे. यापूर्वी 16 मे रोजी उपचार घेत असलेल्या रूग्णांची संख्या 1 लाख 836 एवढी नोंदवण्यात आली होती.

मात्र, मृतांचा आकडा चिंताजनक आहे. सोमवारी देशात 4,334 संक्रमित लोकांचा मृत्यू झाला. एका दिवसात आपला जीव गमावणाऱ्यांची ही सर्वात मोठी संख्या आहे. यापूर्वी 7 मे रोजी 4,233 लोक मरण पावले होते.

देशात कोरोना महामारीचे आकडे

  • मागील 24 तासात एकूण संक्रमित: 2.62 लाख
  • मागील 24 तासात एकूण बरे झाले : 4.22 लाख
  • मागील 24 तासात एकूण मृत्यू : 4,334
  • आतापर्यंत एकूण संक्रमित : 2.52 कोटी
  • आतापर्यंत एकूण बरे झाले : 2.15 कोटी
  • आतापर्यंत एकूण मृत्यू : 2.78 लाख
  • सध्या उपचार सुरु असलेल्या एकूण रुग्णांची संख्या : 33.48 लाख
बातम्या आणखी आहेत...