आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

देशात कोरोना:62 दिवसांनंतर पुन्हा एकदा 7 लाखांपेक्षा कमी झाल्या ऍक्टिव्ह केस, पॉझिटिव्ह रेटही कमी 3.82% झाला, आतापर्यंत 77.59 लाख केस

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आपल्या सर्वांसाठी एक आनंदाची बातमी आहे. देशात कोरोनाचा पॉझिटिव्ह रेट म्हणजेच रुग्ण वाढीची गती दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. मागील पाच दिवसांमध्ये ही गती 6.37% कमी होऊन 3.82% वर आली आहे. मागील 24 तासात 14.69 लाख लोकांची तपासणी झाली असून 3.82% लोक पॉझिटिव्ह आढळून आले असून इतर सर्वांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.

62 दिवसांनंतर पुन्हा एकदा ऍक्टिव्ह केसची संख्या 7 लाखांपेक्षा कमी झाली आहे. 21 ऑगस्ट रोजी देशात 6.96 लाख ऍक्टिव्ह रुग्ण होते. 17 सप्टेंबरला हा आकडा 10.17 लाखांवर पोहोचला होता. परंतु ऑक्टोबर महिन्यात ऍक्टिव्ह केसेसमध्ये घट दिसून आली असून आता 62 दिवसांनंतर पुन्हा एकदा ही संख्या 6.94 लाख झाली आहे.

टेस्टिंगचा आकडा 10 कोटीच्या जवळ
देशात कोरोना तपासणीचा आकडा 10 कोटीजवळ गेला आहे. आतापर्यंत 9.90 कोटींपेक्षा जास्त लोकांची तपासणी झाली आहे. यामध्ये 77 लाख 59 हजार 252 लोक संक्रमित आढळून आले आहेत. आतापर्यंत 69 लाख 45 हजार 875 लोक बरे झाले आहेत. कोरोनामुळे 1 लाख 17 हजार 330 लोकांचा मृत्यू झाला आहे.