आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना देशात:मागील 24 तासात आढळून आले 30029 नवीन रुग्ण, 39020 लोक बरे झाले, 6 दिवसानंतर 40 हजारांपेक्षा कमी केस

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मागील सहा दिवसांपासून सतत 40 हजारांहून अधिक प्रकरणे आढळून आल्यानंतर सोमवारी कोरोना प्रकरणांमध्ये मोठी घट झाली आहे. गेल्या 24 तासांत देशात 30,029 नवीन प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. या दरम्यान, 39,020 लोक कोरोना मुक्त झाले तर 420 लोकांनी आपला जीव गमावला.

केरळमध्ये काळ 13984 लोकांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. सहा दिवसांनंतर केरळमध्ये 20 हजारांपेक्षा कमी प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत, यामुळे देशातील कोरोना आकडेवारीवर परिणाम झाला आहे. येथे सोमवारी, कोरोनामधून बरे झालेल्या लोकांची संख्या नवीन प्रकरणांपेक्षा जास्त होती.

देशात कोरोना महामारीचे आकडे

  • मागील 24 तासात एकूण रुग्ण : 30,029
  • मागील 24 तासात बरे झालेले रुग्ण : 39,020
  • मागील 24 तासात एकूण मृत्यू :420
  • आतापर्यंत एकूण संक्रमित : 3.17 कोटी
  • आतापर्यंत बरे झालेले रुग्ण : 3.08 कोटी
  • आतापर्यंत एकूण मृत्यू : 4.25 लाख
  • सध्या उपचार सुरु असलेल्या रुग्णांची संख्या : 3.98 लाख
बातम्या आणखी आहेत...