आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना देशात:मागील 24 तासात 45,641 नवीन रुग्ण आढळले, 60,258 बरे झाले तर 816 जणांचा मृत्यू, मृत्यूचा आकडा 78 दिवसात सर्वात कमी

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

देशात मागील 24 तासांत 45,641 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. यासोबतच 60,258 रुग्ण कोरोनातून बरे झाले आणि 816 लोकांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. रोजच्या मृत्यूची संख्या 78 दिवसात सर्वात कमी आहे. यापूर्वी 12 एप्रिल रोजी या महामारीमुळे 880 लोकांचा मृत्यू झाला होता. मंगळवारी सक्रिय प्रकरणांमध्ये 15,438 घट झाली. सध्या 5.31 लाख रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

देशात कोरोना महामारीचे आकडे

  • मागील 24 तासात एकूण नवीन रुग्ण : 45,641
  • मागील 24 तासात एकूण बरे झालेले रुग्ण : 60,258
  • मागील 24 तासात एकूण मृत्यू : 816
  • आतापर्यंत एकूण संक्रमित : 3.03 कोटी
  • आतापर्यंत एकूण बरे झालेले रुग्ण : 2.94 कोटी
  • आतापर्यंत एकूण मृत्यू : 3.98 लाख
  • सध्या उपचार सुरु असलेल्या रुग्णांची संख्या : 5.31 लाख
बातम्या आणखी आहेत...