आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना देशात:मागील 24 तासात आढळून आले 41495 नवीन रुग्ण, 37306 बरे झाले, सक्रिय रुग्ण 4 दिवसानंतर पुन्हा 4 लाखांच्या पुढे

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशात कोरोनाची प्रकरणे पुन्हा एकदा वाढू लागली आहेत. शुक्रवारी 41,495 लोकांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. या दरम्यान, 37,306 लोक बरे झाले आणि 598 रुग्णांचा मृत्यू झाला. सक्रिय रुग्णांच्या संख्येत 3573 ची वाढ नोंदवली गेली आहे.

देशातील एकूण सक्रिय प्रकरणांविषयी काही चिंताजनक आकडे समोर येत आहेत. 26 जुलै रोजी उपचार घेत असलेल्या संक्रमित लोकांची संख्या 3.92 लाखांवर पोहोचली होती. गेल्या 4 दिवसांपासून त्यात सातत्याने वाढ होत आहे. गेल्या २४ तासांत देशातील सक्रिय केसेस पुन्हा 4 लाखांच्या पुढे गेले आहेत.

देशात कोरोना महामारीचे आकडे

  • मागील 24 तासात एकूण नवीन केस : 41,495
  • मागील 24 तासात एकूण बरे झालेले रुग्ण : 37,306
  • मागील 24 तासात एकूण मृत्यू : 598
  • आतापर्यंत एकूण संक्रमित : 3.16 कोटी
  • आतापर्यंत एकूण बरे झालेले रुग्ण : 3.07 कोटी
  • आतापर्यंत एकूण मृत्यू : 4.23 लाख
  • सध्या उपचार सुरु असलेल्या रुग्णांची संख्या : 4.02 लाख
बातम्या आणखी आहेत...