आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना देशात:मागील 24 तासात आढळून आले 42530 रुग्ण तर बरे झाले 36552, केरळमध्ये आढळून आले सर्वात जास्त 23676 नवीन रुग्ण

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशात कोरोनाच्या प्रकरणांमध्ये एका दिवसाच्या कमीनंतर पुन्हा एकदा वाढ झाली आहे. मंगळवारी 42,530 रुग्ण आढळले. सोमवारी 30,029 प्रकरणे नोंदवण्यात आली होती. गेल्या 24 तासांत 36,552 संक्रमित लोकांनी या रोगाचा पराभव केला, तर 561 जणांचा मृत्यू झाला. अशाप्रकारे, सक्रिय प्रकरणांच्या संख्येत 5,396 ची वाढ नोंदवण्यात आली आहे. आता 4.04 लाख रुग्णांवर उपचार केले जात आहेत.

सर्वात मोठी चिंता केरळ वाढवत आहे. मंगळवारी येथे 23,676 नवीन प्रकरणे आढळून आली. सोमवारी हा आकडा 13,984 होता. राज्यातील सक्रिय प्रकरणांमध्ये 9,959 ची मोठी वाढ झाली आहे. आता येथे 1.73 लोकांवर उपचार सुरु आहेत.

देशात कोरोना महामारीचे आकडे

  • मागील 24 तासात एकूण नवीन रुग्ण : 42,530
  • मागील 24 तासात एकूण बरे झालेले रुग्ण : 36,552
  • मागील 24 तासात एकूण मृत्यू : 561
  • आतापर्यंत एकूण संक्रमित : 3.17 कोटी
  • आतापर्यंत एकूण बरे झालेले रुग्ण : 3.09 कोटी
  • आतापर्यंत एकूण मृत्यू : 4.25 लाख
  • सध्या उपचार सुरु असलेल्या रुग्णांची एकूण संख्या : 4.04 लाख
बातम्या आणखी आहेत...