आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
देशात काेरोनाचा कहर थांबण्याचे नाव घेत नाही. देशभरात शुक्रवारी २३ हजार नवीन कोरोना रुग्ण सापडले. आजपर्यंतचा हा सर्वात मोठा आकडा आहे. देशात आतापर्यंत ६ लाख ४०,८४३ कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. महाराष्ट्रानंतर तामिळनाडूमध्ये रुग्णांची संख्या एक लाखापेक्षा जास्त झाली आहे. एका दिवसात तब्बल ४४९ रुग्णांच्या मृत्यूसह एकूण मृतांची संख्या १८,६५३ झाली आहे.
देशात कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण २.९१% आहे. बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढून ६१.२.% झाले. एकूण रुग्णांपैकी ३ लाख ९२,४०३ जण घरी परतले. कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव असलेल्या महाराष्ट्रात शुक्रवारी पुन्हा मोठ्या संख्येने रुग्ण आढळले. ६,३६४ नवीन रुग्णांसह ही संख्या १,९२,९९० झाली. यापैकी ८१,६३४ रुग्ण मुंबईत आहेत. दुसऱ्या क्रमांकाचा तामिळनाडू राज्यात ४,२९ नवीन रुग्णांसह एकूण रुग्ण १,०२,७२१ झाले आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.