आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना देशात:मागील 12 दिवसात सक्रिय प्रकरणांमध्ये 11 वेळा वाढ, पॉझिटिव्हिटी रेट दुप्पट; सलग 9 व्या दिवशी 40 हजारांपेक्षा जास्त रुग्ण

नवी दिल्ली21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशातील कोरोनाच्या वाढत्या प्रकरणामुळे तिसरी लाट येईल अशी शक्यता वाटत आहे. कारण गेल्या 24 तासात 42 हजार 667 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. दरम्यान, 36 हजार 422 लोक उपचार घेत बरे झाले तर यामध्ये 342 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यासोबतच सक्रिय रुग्णांच्या आकडेवारीत देखील वाढ होत आहे. शुक्रवारी या आकडेवारीत 5 हजार 898 ने वाढ झाली. देशात सध्या 3.99 लाख लोकांवर उपचार सुरु आहे.

देशात गेल्या 10 दिवसात सलग 9 व्या दिवशी 40 हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळले आहे. सक्रिय प्रकरणांचा विचार केल्यास 30 ऑगस्ट रोजी 6 हजार 200 ने घट झाली होती. विशेष म्हणजे पॉझिटिव्हिटी रेटमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाढ होत आहे. 23 ऑगस्ट रोजी पॉझिटिव्हिटी 1.3% टक्के होते, जे आता 2 सप्टेंबर रोजी 2.7% आले आहे.

देशात कोरोना महामारीचे आकडे

  • मागील 24 तासात एकूण नवीन रुग्ण : 42,667
  • मागील 24 तासात एकूण बरे झालेले रुग्ण : 36,422
  • मागील 24 तासात एकूण मृत्यू : 342
  • आतापर्यंत एकूण संक्रमित : 3.29 कोटी
  • आतापर्यंत एकूण बरे झालेले : 3.20 कोटी
  • आतापर्यंत एकूण मृत्यू : 4.40 लाख
  • सध्या उपचार सुरु असलेल्या एकूण रुग्णांची संख्या : 3.99लाख
बातम्या आणखी आहेत...