आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

कोरोना संसर्ग:कोरोनाचे 40 लाखांवर रुग्ण; 13 दिवसांत 10 लाख रुग्ण वाढले, याच काळात अमेरिकेत 4.98 तर ब्राझीलमध्ये 4.64 लाख रुग्णच वाढले

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नव्या रुग्णांची संख्या कमी झाली नाही तर पुढील 10 ते 12 दिवसांत भारतात संक्रमितांचा आकडा 50 लाखांवर जाईल

देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या सुमारे 40 लाख झाली आहे. शुक्रवारी 83,341 नव्या रुग्णांसह एकूण रुग्ण 39,36,747 झाले. शनिवार सकाळी ही संख्या 40 लाखांवर जाईल. 10 लाख रुग्ण गेल्या 13 दिवसांत वाढले. 10 लाख रुग्ण वाढण्याची ही जगातील सर्वाधिक गती आहे. अमेरिकेत या 13 दिवसांत 4.98 लाख रुग्ण वाढले, तर ब्राझीलमध्ये हा आकडा 4.64 लाख होता. अमेरिका आणि ब्राझीलनंतर भारत तिसरा देश असेल, जेथे संक्रमितांची संख्या 40 लाखांवर आहे. अमेरिकेने 21 जुलैला आणि ब्राझीलने 2 सप्टेंबरला हा आकडा ओलांडला आहे.

- देशात गुरुवारी 11,69,765 लोकांची चाचणी झाली. तज्ज्ञांनुसार, आता या तपासणीची क्षमता आता वाढवून दिवसाला किमान १५-१७ लाख एवढी व्हायला हवी.

भारत बायोटेकच्या पहिल्या चाचणीत साइड इफेक्ट दिसला नाही
नवी दिल्ली | भारत बायोटेकच्या कोरोना लसीच्या (कोव्हॅक्सिन) मानवी चाचणीत पहिल्या टप्प्यात कोणताही साइड इफेक्ट दिसला नाही. सीडीएससीओने दुसऱ्या टप्प्याच्या चाचणीला आता मंजुरी दिली आहे.

रशियाची लस पूर्णपणे सुरक्षित असल्याचा दावा
मॉस्को | रशियाने स्पुटनिक व्ही नावाने काढलेल्या लसीच्या चाचण्या यशस्वी झाल्यानंतर ही लस पूर्णपणे सुरक्षित असल्याचा दावा मेडिकल जर्नल द लॅन्सेटने केला आहे. लॅन्सेटने एका संशोधनाअंती निष्कर्षात हा दावा केला.