आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना देशात:मागील 24 तासात 38696 नवीन रुग्ण आढळून आले आणि 40020 बरे झाले, सक्रिय प्रकरणांमध्ये सलग 3 दिवसांच्या वाढीनंतर 1951 ने घट

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशातील कोरोना प्रकरणांमध्ये शुक्रवारी किरकोळ दिलासा मिळाला आहे. गेल्या 24 तासांत 38,696 नवीन रुग्ण आढळून आले आणि 40,020 बरे झाले, तर 616 जणांचा मृत्यू झाला. अशा प्रकारे सक्रिय प्रकरणांमध्ये 1951 ची घट झाली आहे. यापूर्वी, गेल्या तीन दिवसांपासून सक्रिय प्रकरणांमध्ये वाढ होत होती.

दैनंदिन प्रकरणांमध्ये आघाडीवर असलेल्या केरळमध्येही शुक्रवारी कोरोना प्रकरणांमध्ये किंचित घट दिसून आली. येथे 19,948 रूग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला तर 19,480 बरे झाले आणि 187 संक्रमित रुग्णांचा मृत्यू झाला.

केरळमध्ये प्रकरणे दुप्पट होण्याची भीती
केरळच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी म्हटले आहे की, राज्यातील कोरोनाची प्रकरणे पुढील काही दिवसांमध्ये दुप्पट होऊ शकतात. याचे कारण असे की, येथे अनेक जिल्ह्यांमध्ये R-व्हॅल्यू 1 पेक्षा जास्त येत आहे. या व्हॅल्यूला अर्थ असा आहे की, 1 रुग्ण 1 व्यक्तीस संक्रमित करू शकतो. राज्यात आधीच दररोज सुमारे 20,000 प्रकरणे नोंदवली जात आहेत.

देशात कोरोना महामारीचे आकडे

  • मागील 24 तासात एकूण आढळून आलेले रुग्ण : 38,696
  • मागील 24 तासात एकूण बरे झालेले रुग्ण : 40,020
  • मागील 24 तासात एकूण मृत्यू : 616
  • आतापर्यंत एकूण संक्रमित : 3.19 कोटी
  • आतापर्यंत एकूण बरे झालेले रुग्ण : 3.10 कोटी
  • आतापर्यंत एकूण मृत्यू : 4.27 लाख
  • सध्या उपचार सुरु असलेल्या रुग्णांची संख्या : 4.06 लाख
बातम्या आणखी आहेत...