आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

देशात कोरोना:दिल्लीत एकाच दिवसात आढळून आले 7000 पेक्षा जास्त कोरोना रुग्ण, 15 राज्यात वाढत आहेत ऍक्टिव्ह केस

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

देशात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. ऍक्टिव्ह केस आता 2-3 राज्यांमध्ये नाही तर 15 राज्यात वाढत आहेत. सर्वात वाईट स्थिती दिल्लीत आहे. येथे मागील 15 दिवसांमध्ये 11 वेळेस ऍक्टिव्ह केस वाढल्या आहेत. शुक्रवारी दिल्लीत एकूण 7,178 कोरोना रुग्ण आढळून आले.

या व्यतिरिक्त उत्तर प्रदेश, तेलंगणा, बिहार, छत्तीसगढ, हरियाणा, चंदीगड, अंदमान-निकोबार, मिझोराम, दादर अँड नगर हवेली, लडाख, मेघालय, मणिपूर, हिमाचल प्रदेश, त्रिपुरा आणि पंजाबमध्ये ऍक्टिव्ह केसची संख्या वाढत आहेत. मागील 24 तासात या राज्यांमध्ये 4 हजार पेक्षा जास्त रुग्ण आढळून आले आहेत.

दिलासादायक गोष्ट म्हणजे, महाराष्ट्र, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि पश्चिम बंगालसहित काही राज्य असेही आहेत जेथे ऍक्टिव्ह रुग्ण कमी होत आहेत. या राज्यांमुळे देशात ओव्हरऑल ऍक्टिव्ह केसेसमध्ये गुरुवारीसुद्धा 7 हजारपेक्षा कमी रुग्ण आढळून आले. यामध्ये एकट्या महाराष्ट्रात 6339 ऍक्टिव्ह रुग्ण कमी झाले.