आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

देशात कोरोना:आतापर्यंत 1 लाख 74 हजार 491 प्रकरणे: पंजाबने 30 जूनपर्यंत लॉकडाउन वाढवला, प.बंगालमध्येही 15 जूनपर्यंत कायम राहणार

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
चित्र मुंबईतील रेल्वे स्थानकाचे आहे. उत्तर प्रदेशला जाणारे शेकडो लोक स्टेशनवर पोहोचले. येथून बरेच स्थलांतरित मजूर विशेष गाड्यांद्वारे त्यांच्या राज्यात पोहोचले आहेत.
  • देशात आतापर्यंत 4983 रुग्णांचा मृत्यू, महाराष्ट्रात सर्वाधिक 2098 लोकांनी जीव गमावला

देशातील कोरोना बाधितांची संख्या 1 लाख 74 हजार 491 झाली आहे. शनिवारी मध्यप्रदेश आणि पश्चिम बंगाल सरकारने लॉकडाउन 15 जूनपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला. दुसरीकडे पंजाब देखील 30 जूनपर्यंत लॉकडाउन कायम ठेवणार आहे. दरम्यान सर्व राज्ये केंद्राच्या नवीन गाइडलाइननुसार निर्बंधामध्ये सूट देणार आहेत. देशात केवळ कंटेनमेंट झोनमध्ये 30 जूनपर्यंत लॉकडाउन कायम राहणार आहे. 

महाराष्ट्रात मागील 24 तासांत 114 पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आणि एकाचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यं 2325 पोलिस कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. तर 26 जणांचा बळी गेला आहे. दरम्यान राज्य सरकारने सार्वजनिक ठिकाणी तंबाखू खाण्यावर आणि थुंकण्यावर 1 ते 5 हजार रुपयांपर्यंत दंड आकारण्याचा निर्णय घेतला आहे. 

शनिवारी बिहारमध्ये 150, ओडिशात 96, राजस्थानात 49, नागालँडमध्ये 11, हिमाचल प्रदेशात 2 आणि मणिपुरमध्ये 1 रुग्ण आढळला. याव्यतिरिक्त 150 इतर रुग्ण सापडले मात्र ते कोणत्या राज्यातील आहेत याबाबत माहिती मिळाली नाही. याआधी शुक्रवारी देशात एका दिवसात सर्वाधिक 8101 रुग्ण आढळले होते. तर विक्रमी 11 हजार 729 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. तर 269 जणांचा मृत्यू झाला होता. महाराष्ट्रात एका दिवसात सर्वाधिक 116 रुग्णांचा मृत्यू झाला होता. 

ही आकडेवारी Covid19.Org नुसार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार, देशात 1 लाख 73 हजार 763 कोरोनारुग्ण आहेत. यातील 86 हजार 422 जणांवर उपचार सुरू असून 82 हजार 370 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 4971 जणांचा मृत्यू झाला आहे. 

केजरीवाल म्हणाले - दिल्लीत 15 दिवसांत 8500 रुग्ण वाढले

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, राजधानीत कोरोनाव्हायरस प्रकरणे वेगाने वाढले आहेत, मात्र घाबरण्याचे काहीही कारण नाही. ते म्हणाले की, आम्ही कोरोनाच्या चार पावले पुढे आहोत. दिल्लीत मागील 15 दिवसांत जवळपास 8500 प्रकरणे समोर आली. यातील 500 रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागले. एकूण रुग्णसंख्यांपैकी 2100 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बहुतेक लोक घरी बरे होतात, म्हणून घाबरून जाण्याची गरज नाही. दिल्लीत 6500 बेड तयार असून पुढील आठवड्यापर्यंत ही संख्या 9500 होणार असल्याची माहिती केजरीवालांनी दिली. 

अपडेट्स...

दिल्लीहून मॉस्कोला जाणाऱ्या एअर इंडियाचे विमान अर्ध्या रस्त्यातच परत बोलावले. पायलटचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती ग्राउंड टीमने दिली होती. आता रशियात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी दुसरे विमान पाठवले जाईल.

दिल्लीतील लोक नारायण जयप्रकाश रुग्णालयाचे संचालक यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या 2 कर्मचार्‍यांनाही संसर्ग झाल्याचे आढळले आहे.

0