आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशात कोरोना:फेस्टिव्ह सीजन आणि थंडीमध्ये संक्रमण वाढण्याचा धोका जास्त : आरोग्यमंत्री, पुढील अडीच महिने सर्वात कठीण, रुग्णांचा आकडा 74 लाखांच्या पुढे

नवी दिल्ली2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • फेस्टिव्ह सीजन आणि थंडीच्या दिवसात संक्रमण वाढण्याचा धोका - आरोग्यमंत्री

देशामध्ये कोरोना रुग्णांचा आकडा शुक्रवारी 74 लाखांच्या पुढे गेला आहे. आतापर्यंत 74 लाख 30 हजार 635 लोक संक्रमित आढळून आले आहेत. दिलासादायक गोष्ट म्हणजे यापैकी 65 लाख 21 हजार 634 लोक बरे झाले आहेत. कोरोना संक्रमणामुळे आतापर्यंत 1 लाख 13 हजार 32 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

संक्रमणाच्या वाढत्या प्रकरणांमध्ये दिलासादायक बाब म्हणजे ऍक्टिव्ह रुग्ण कमी होत आहेत. मागील 15 दिवसांमध्ये ऍक्टिव्ह रुग्ण 1.39 लाखांपेक्षा कमी आहेत. 1 ऑक्टोबरला 9.42 लाख ऍक्टिव्ह रुग्ण होते, जे आता कमी होऊन 7.94 लाख झाले आहेत. दररोज जवळपास 8 हजार केस कमी होत आहेत. हेच प्रमाण राहिल्यास 31 ऑक्टोबरपर्यंत देशात 6.75 लाख रुग्ण राहतील.

फेस्टिव्ह सीजन आणि थंडीच्या दिवसात संक्रमण वाढण्याचा धोका - आरोग्यमंत्री
केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी शुक्रवारी डिपार्टमेंट ऑफ सायन्स आणि टेक्नॉलॉजी तसेच सीएसआयआरच्या वैज्ञानिकांसोबत बैठक केली. देशात सध्या तीन व्हॅक्सिनवर काम सुरु असल्याचे त्यांनी सांगिलते. यामधील एक व्हॅक्सिन फेज-3 ट्रायल प्रोसेसमध्ये आहे. आरोग्यमंत्र्यांनी सांगिलते की, पुढील अडीच महिने देशासाठी खूप कठीण आहेत. फेस्टिव्ह सीजन आणि थंडीमध्ये संक्रमण वाढण्याचा धोका जास्त वाढला आहे. अशा परिस्थितीमध्ये सर्वांनी सतर्क राहून लोकांना जागरूक करणे आवश्यक आहे.

बातम्या आणखी आहेत...