आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

देशात कोरोना:रुग्णांचा आकडा 84 लाखांच्या पुढे, 50% विद्यार्थी क्षमतेने युनिव्हर्सिटी-कॉलेज उघडण्यास परवानगी

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

देशात कोरोना रुग्णांचा आकडा 84 लाखांच्या पुढे गेला आहे. आतापर्यंत 84 लाख 11 हजार 34 लोक संक्रमित झाले असून यापैकी 77 लाख 64 हजार 763 लोक बरे झाले आहेत. सध्या 5 लाख 19 हजार 508 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. कोरोना संक्रमणामुळे आतापर्यंत 1 लाख 25 हजार 29 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

यादरम्यान युनिव्हर्सिटी ग्रांट कमिशन (UGC) ने 50% विद्यार्थी क्षमतेने युनिव्हर्सिटी आणि कॉलेज उघडण्यास परवानगी दिली आहे. यासाठी स्टॅंडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर (SOP) जारी करण्यात आली आहे. UGC ने सांगितले आहे की, स्टेट युनिव्हर्सिटी आणि कॉलेज केव्हा उघडणार याचा निर्णय सर्व स्टेट्सचे सरकार घेतील परंतु केंद्र सरकारच्या अखत्यारीत येणारे हायर एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स आणि युनिव्हर्सिटी क्लासेस सुरु करण्याची तारीख कुलगुरू किंवा डायरेक्टर स्वतः निश्चित करतील.