आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • India Corona Patients, Vaccination News And Updates, It Took Only Two Weeks To Go From Rs 2 Crore To Rs 2.5 Crore

देशात 2.5 कोटी कोरोना रुग्ण:2 कोटींवरून 2.5 कोटी होण्यास फक्त दोन आठवडेच लागले

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दिलासा हा की त्यापैकी 2.15 कोटी बरे झाले आहेत

देशात कोरोना झालेल्यांची संख्या सोमवारी २.५ कोटींवर पोहोचली, पण दिलाशाची बाब अशी की, त्यापैकी २.१५ कोटी लोक बरे झाले आहेत. १५ महिन्यांच्या कोरोना काळात देशात फक्त १.८% लोकसंख्येला संसर्ग झाला. तथापि, ३५ लाखांपेक्षा जास्त लोकांवर अजूनही उपचार सुरू आहेत. २.७८ लाख लोकांना वाचवता आले नाही. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत गेल्या दीड आठवड्यापासून रोज आढळणाऱ्या नव्या रुग्णांच्या संख्येत घट होत आहे.असे असले तरीही जूनअखेरपर्यंत देशात एकूण संक्रमितांची संख्या ३ कोटींवर जाऊ शकते.

रिकव्हरी रेटमध्ये सुधारणा: ...लवकरच तो जानेवारीच्या स्तरावर येणार

देशात १५ मोठ्या राज्यांत रिकव्हरी रेट सुधारत आहे. तेथे बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या रोज आढळणाऱ्या रुग्णांपेक्षा जास्त झाली आहे. गेल्या महिन्यापर्यंत देशातील निम्मे रुग्ण महाराष्ट्रात आढळत होते. तेथे सुधारणा होत आहे. केरळमध्ये बरे होणाऱ्यांची संख्या नव्या रुग्णांपेक्षा चौपट आहे. देशात मे महिन्याच्या सुरुवातीपासून रिकव्हरी रेट घसरत होता. पण आता त्यात पुन्हा सुधारणा होत आहे. त्याचे कारण सक्रिय रुग्णांची घटती संख्या. हा ट्रेंड कायम राहिल्यास तो जानेवारीच्या स्तरापर्यंत जाऊ शकतो. जानेवारीत रेट ९७% होता.

...पण भारत बरा, कारण
भारतापेक्षा जास्त रुग्ण अमेरिकेत आहेत. तेथे ३४१ दिवसांतच अडीच कोटी रुग्ण झाले. भारतात ४७३ दिवस लागले. अमेरिकेत ३.३७ कोटी लोकांना कोरोना झाला. २.७१ कोटी बरे झाले आहेत. रिकव्हरी रेट ८०.४८% आहे. भारताचा रिकव्हरी रेट ८५.५७% आहे.

बातम्या आणखी आहेत...