आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • India Corona Update : Record Increase Of 25559 Patients In 24 Hours, 7.69 Lakh Cases In The Country So Far, Number Of Coronary Surgeons In Delhi More Than 74%

कोरोना देशात:संक्रमितांचा आकडा 7.85 लाखांवर; पंजाबमध्ये प्लाज्मा बँक सुरू होईल, बंगालमध्ये कंटेनमेंट झोनमध्ये 7 दिवस लॉकडाउन

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

देशातील संक्रमितांची संख्या 7 लाख 85 हजार 373 झाली आहे. हे आकडे covid19india.org नुसार आहेत. तिकडे, दिल्लीनंतर आता पंजाब सरकारनेही प्लाज्मा बँक सुरू करण्याची घोषणा केली आहे. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी कोरोना संदर्भात झालेल्या बैठकीत याची घोषणा केली.

दरम्यान, भाजप नेते आणि राज्यसभा खासदार ज्योतिरादित्य सिंधिया यांनी गुरुवारी आपला प्लाज्मा डोनेट केला आहे. त्यांनी म्हटले की, देशातील नागरिकांची सुरक्षा करणे आपले दायित्व आहे. तर, केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी दावा केला आहे की, अद्याप देशात कम्युनिटी ट्रांसमिशन सुरू नाही.

त्यांनी पुढे म्हटले की, 'आज आमच्या चर्चेदरम्यान, जानकारांनी परत एकदा म्हटले आहे की, भारतात अद्याप कम्युनिटी ट्रांसमिशन सुरू झाले नाही. काही ठराविक परिसरात ट्रांसमिशन आहे, परंतू संपूर्ण देशात कम्युनिटी ट्रांसमिशन आहे, असे म्हणता येणार नाही. आज आपला रिकव्हरी रेट 62.08% आहे. देशातील मृत्यूदर 2.75% आहे.

बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या की, गुरुवारी संध्याकाळी 5 वाजता राज्याच्या कंटेनमेंट झोनमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात येईल. सध्या लॉकडाऊन केवळ 7 दिवसांसाठी असेल. गरज वाटल्यास लॉकडाऊन पुन्हा एकदा वाढवण्यात येणार आहे. मध्यप्रदेशात वाढत असलेली कोरोना रुग्णांची संख्या पाहता गृहमंत्री आणि आरोग्य मंत्री निरोत्तम मिश्रा यांनी बुधवारी म्हटले की, आता रविवारी संपूर्ण मध्य प्रदेशात लॉकडाऊन असणार आहे. दूसऱ्या प्रदेशांमधून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांमुळे प्रदेशची परिस्थिती बदलत आहे. प्रदेशात येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची बॉर्डरवर तपासणी केली जाणार आहे. 

0