आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशात सणांचा हंगाम सुरू होण्याआधी लसीकरणाचा वेग वाढवण्यात आला आहे. मंगळवारपर्यंत ७० कोटी डोस देण्यात आले. यातील १० कोटी मागील १४ दिवसांतच देण्यात आले. विशेष म्हणजे दिवाळीपर्यंत देशात ५० कोटी लसी आणखी तयार होतील. ५ कोटी लसी राज्यांकडे उपलब्ध आहेत. म्हणजे ५५ कोटी लसी उपलब्ध होतील. यातील ४० डोस जर नव्या लोकांना लागले तर देशातील १००% प्रौढांना एक डोस दिलेला असेल. कारण आतापर्यंत ५४ कोटी लोकांना एक डोस देण्यात आला आहे. आधार डेटानुसार, देशात १८ वर्षांवरील लोकसंख्या ९४ कोटी आहे. म्हणजे अजून ४० कोटी लोक बाकी आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने सांगितले, सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये सुमारे ५० कोटी लसी उपलब्ध होतील. यातील ४० कोटी कोविशील्ड, ७ कोटी कोव्हॅक्सिन, २ कोटी जॉन्सन अँड जॉन्सन आणि सुमारे १ कोटी झायकोव्ह-डीचे असतील. आतापर्यंत उपलब्ध संशोधन अहवालातून दिसते की, एक डोस घेतल्याने संसर्गाची भीती कमी हाेते. संसर्ग झाला तरी रुग्णालयात जाण्याची वेळ कमी येते. म्हणून कोरोनाच्या लढाईत एक डोसही महत्त्वाचा आहे.
अलर्ट...मुंबईत रोज आढळणारे रुग्ण झाले दुप्पट, केरळनंतर दुसऱ्या राज्यात ५ महिन्यांनी अशी वाढ
मुंबईत रोज आढळणारे रुग्ण चार आठवड्यांपासून वाढत आहेत. १५ ऑगस्टपर्यंत रोज २५० रुग्ण आढळत होते. सोमवारी ४९५ रुग्ण आढळले. यापूर्वी मुंबईत हा ट्रेंड मार्चमध्ये होता. यानंतर दुसरी लाट आली. महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले, तिसरी लाट आली आहे. मात्र, आरोग्य विभागानुसार, तिसरी लाट आलेली नाही.
डिसेंबरपर्यंत देशातील सर्व प्रौढांना दोन्ही डोस द्यायचे असतील, तर आता रोज सरासरी १.०२ कोटी डोस द्यावे लागतील
देशात गेल्या १४ दिवसांत रोज दिल्या जाणाऱ्या डोसची सरासरी ७१ लाखांपेक्षा थोडी अधिक होती. या वेगाने या वर्षाच्या अखेरपर्यंत ९४ कोटी प्रौढांचे दोन्ही डोस पूर्ण होणार नाहीत. हे उद्दिष्ट गाठण्यासाठी आता रोज सरासरी १.०२ कोटी डोस द्यावे लागतील. हे पुढील दोन महिन्यांपर्यंत शक्य नाही. कारण, सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये देशात एकूण ५० कोटी लसी उपलब्ध असतील. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये देशात लसींचे उत्पादन दुप्पट होईल असे केंद्र सरकारला वाटते. असे झाल्यास डिसेंबरपर्यंत उद्दिष्ट गाठता येऊ शकेल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.