आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • National
 • India Corona Updates; Corona Test Reduced; States Claim That The Growth Of New Patients Has Stopped Since Then But Truth Is Different

महामारीत राज्यांचे वास्तव...:चाचण्या घटवल्या; त्याआडून नव्या रुग्णांतील वाढ थांबल्याचा राज्यांचा दावा

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
 • कॉपी लिंक
 • दिल्ली, केरळ व महाराष्ट्राने कोरोना टेस्ट घटवल्या
 • कोरोनाचा पीक दाखवण्याच्या खटाटोपात संसर्ग जास्त फैलावू नये
 • बळींचा सरकारी आकडा अडीच लाखांच्याही पार

देशात काेरोनाच्या दुसऱ्या लाटेने भयंकर चित्र दाखवले आहे. अनेकांचे आप्त-नातेवाइक मृत्यू पावत आहेत. देशात कोरोनामुळे मृतांचा सरकारी आकडा सोमवारी अडीच लाखांच्या (२,५०,०२५) पार गेला. महत्त्वाची बाब म्हणजे, शेवटचे ५० हजार मृत्यू केवळ १३ दिवसांत झाले आहेत. दुसरीकडे, रोज होणाऱ्या मृत्यंूत घसरणीचा कोणताही ट्रेंड दिसून येत नाही आहे. देशात गेल्या ८ दिवसांत संसर्ग सातत्याने वाढला आहे. डब्ल्यूएचओची मार्गदर्शक तत्त्वे म्हणतात, जेवढी जास्त टेस्टिंग होईल, तितक्या लवकर संसर्गावर नियंत्रण शक्य होईल.

 • देशात कोरोनामुळे १२ मार्च २०२० ला पहिला मृत्यू नोंद झाला. पहिला रुग्ण ३० जानेवारीला सापडला होता.
 • देशात ७ मे रोजी एका दिवसात सर्वाधिक ४,२३३ मृत्यू झाले. तथापि, ही संख्या अमेरिकेपेक्षा कमी आहे.
 • यंदा एका दिवसातील सर्वात कमी ७५ मृत्यू ६ फेब्रु.ला झाले. त्यानंतर बळींचा संख्या सातत्याने वाढतच आहे.
 • देशात १३.४४ कोटी लाेकांना पहिला, तर ३.५७ कोटींना दोन्ही डोस मिळाले.

राज्यांची रोजची सरासरी टेस्टिंग पाहता दर १० लाख लाेकांमागे दररोज सर्वाधिक ६४९१ टेस्ट पुद्दुचेरी करत आहे. मोठ्या राज्यांत प. बंगाल सर्वात कमी टेस्ट करत अाहे. देशाची सरासरी १,०८९ टेस्ट इतकी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्र्यांना कोरोना टेस्टिंग, विशेषत्वाने आरटीपीसीआर टेस्ट वाढवण्याचे वारंवार सांगत आहेत. प्रत्यक्षात राज्यांनी टेस्टिंग कमी केली आहे. देशात एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात रोजची सरासरी टेस्टिंग जास्त होती, आता घटली आहे. यामुळे रुग्णही कमी येत आहेत. राज्य सरकारे संसर्गाचा पीक आल्याचे म्हणू लागली आहेत. २८ एप्रिलला देशात २०.६८ लाख टेस्ट झाल्या. संसर्ग दर १८.७% होता. ८ मे राेजी देशात १४.६६ लाख टेस्ट झाल्या व संसर्ग दर २६.७% झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...