आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशातील कोरोना संक्रमितांचा आकडा कमी होताना दिसत आहे. गुरुवारी देशभरात 3 लाख 42 हजार 896 कोरोना संक्रमित आढळले, तर 3 लाख 44 हजार 570 रुग्णांनी कोरोनावर मात केली. तसेच, 3,997 रुग्णांचा मृत्यू झाला. या महिन्यात तिसऱ्यांदा ठीक होणाऱ्या रुग्णांचा आकडा नवीन संक्रमितांपेक्षा जास्त आहे. 4 दिवसापूर्वी, 10 मे रोजी 3.29 लाख नवीन रुग्ण आढळले होते, तर 3.55 लाख संक्रमित ठीक झाले होते.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सर्वात जास्त अॅक्टीव्ह केस, म्हणजेच उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या 9 मे रोजी 37.41 लाख होती. ती आता कमी होऊन 37 लाख झाली आहे. गुरुवारी यात 5,753 घट झाली. दरम्यान, देशात ठीक होणाऱ्या रुग्णांचा आकडा 2 कोटींच्या पुढे गेला आहे.
देशातील कोरोना महामारीची आकडेवारी
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.