आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • India Corona Vaccination News And Updates, India Will Have 216 Crore Doses From August To December

लसीकरण योजना:ऑगस्ट ते डिसेंबरपर्यंत 216 कोटी डोस; दोन लसींऐवजी मिळणार आठ पर्याय

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • लसीचा तुटवडा जाणवणार नाही : केंद्र सरकारचा दावा

लसीच्या तुटवड्यावरून राज्यांच्या तक्रारी पाहता कंेद्राने डिसेंबर २०२१पर्यंतच्या लस उपलब्धतेचा आराखडाच जाहीर केला आहे. केंद्राने केलेल्या दाव्यानुसार ऑगस्ट ते डिसेंबर २०२१ दरम्यान देशात २१६ कोटी डोस मिळतील. देशातील ९५ कोटी नागरिकांसाठी ही लस पुरेशी असेल. सध्या देशात कोविशील्ड आणि कोव्हॅक्सिन या दोनच लसी आहेत. डिसेंबरपर्यंत या दोन्हीशिवाय लसीचे आणखी सहा पर्याय असतील.

दरम्यान, २ ते १८ वयोगटासाठी लसीच्या चाचणीस मंजुरी देण्यात आली आहे. पाच-सहा महिन्यांत या वयोगटासाठी लस उपलब्ध होईल, अशी आशा आहे. नॅशनल एक्स्पर्ट ग्रुप ऑन व्हॅक्सिन अॅडमिनिस्ट्रेशन फॉर कोविड-१९चे (नेगव्हॅक) प्रमुख प्रो. व्ही. के. पॉल यांच्यानुसार, भारतात ऑगस्ट ते डिसेंबर-२०२१ पर्यंत लसीचे २१६ कोटी डोस उपलब्ध होण्याची आशा आहे. कंपन्यांशी चर्चेनंतर ही संख्या निश्चित झाली आहे.

स्पुटनिक-व्ही लस पुढील आठवड्यापर्यंत, डिसेंबरपर्यंत याचे १५.६ डोस आणि सर्वाधिक ७५ कोटी डोस सीरमच्या कोविशील्डचे मिळतील

रशियाच्या स्पुटनिक-व्ही लसीची पुढील आठवड्यात देशात विक्री सुरू होऊ शकेल. डिसेंबरपर्यंत हे १५.६ कोटी डोस मिळतील, असे मानले जाते. याचे उत्पादन व वितरण भारतात डॉक्टर रेड्डीज लॅबकडे आहे. या योजनेनुसार सीरमच्या कोविशील्डचे सर्वाधिक ७५ कोटी डोस तर भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनचेही ५५ कोटी डोस मिळतील. सीरम कोविशील्डशिवाय दुसरी नोव्हावॅक्स लसही आणणार आहे. तर, भारत बायोटेकही आपली नाकातून टाकावयाची लस बाजारात उतरवत आहे. शिवाय, बायो-ई व झायड्स कॅडिलाच्या लसीही येतील.

डिसेंबरपर्यंत कुणाच्या किती लसी उपलब्ध होणार...

कंपनीडोस (कोटींत)
कोविशील्ड75
कोव्हॅक्सिन55
बायो-ई ​​​​​​​30
झायडस कॅडिला ​​​​​​​5
सीरमची नोव्हावॅक्स ​​​​​​​20
भारत बायोटेकची नोझल ​​​​​​​
10
स्पुटनिक ​​​​​​​15.6
जिनोव्हा ​​​​​​​6

भारत बायोटेक तंत्रज्ञान देण्यास तयार : प्रो. पॉल
नेगव्हॅकचे प्रमुख प्रो. व्ही. के. पॉल म्हणाले, आयसीएमआरसोबत तयार केलेल्या भारत बायोटेकच्या लसीचे तंत्रज्ञान जाहीर करू, परंतु अशी विशिष्ट सुविधा आणि तंत्र असलेल्या लॅब देशातील कंपन्यांकडे खूपच कमी आहेत.

कोविशील्डच्या दोन डोसमधील अंतर आता १२-१६ आठवडे
कोविशील्डच्या दोन डोसमधील अंतर आता ६-८ आठवड्यावरून १२-१६ आठवडे करण्यात आले आहे. “एनटागी’च्या या प्रस्तावाला केंद्र सरकारनेही मंजुरी दिली.

बातम्या आणखी आहेत...